पान:विचार सौंदर्य.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 34

विचार सौंदर्य



व्हावयाचा.'एकच प्याल्यां 'तील' सिंधू 'चें वगैरे बालगंधर्वाचें शोकरसोत्पादक नाट्य पाहतांना कांहीं अडाणी बाया शोकप्रचुर देखावे सह्य न झाल्यामुळे नाटकगृह सोडून जातात है मीं ऐकले आहे. मला देखील या बायांप्रमाणें रहूं येतें, पण मी बराच समरस झालों तरी स्वतःची वा. म. जोशी ही भूमिका (व खुर्ची) सोडीत नाहीं. आणि म्हणून मला रसास्वाद घेतां येतो !

 समरसत्वाकडे प्रवृत्ति किंवा गति आहे, जितकें त्याच्या जवळ जातां येईल तेवढें जावयाचें, अगदी जवळ जाण्याची कमाल किंवा पराकाष्ठा करावयाची, पण स्पर्श मात्र करावयाचा नाहीं, असा हा प्रकार आहे आणि त्याला जराशी कठिण पण समर्पक उपमा द्यावयाची म्हणजे गणितांतील असंपाती ' रेषेची ( Asymptote ची ) देतां येईल. ' असंपाती ' रेषा अशी असते, की तिच्या स्वाभाविक दिशेनें ती लांबविली असतां दुसऱ्या एका विशिष्ट वक्र रेषेजवळ जाण्याकडे तिची प्रवृत्ति असते, पण अनंततेपर्यंत लांबविली तरी ती स्पर्श कधीं करूं शकत नाहीं. असंपाती रेषेची इंग्लिशमध्यें अशी व्याख्या केलेली आहे-“ Asymptote is a line which approaches nearer and nearer to some curve but though infinitely extended would never meet it.” पोहतांना आपण पाण्यांत बहुतेक बुडलेले असतों, पण पूर्णपणे कधीं बुडत नाहीं. आणि बुडी घेतली तर लगेच बाहेर येतों, त्याप्रमाणेच काव्यरससागरांत क्रीडार्थ अवगाहन करीत असतां ' स्व ला आपण पूर्णपणे बुडूं द्यावयाचें नाहीं, तर डोकें वर ठेवून पोहत असावयाचें आणि असें केलें तरच अलौकिक आनंद होईल. नाहीं तर आपत्ति ओढवावयाची !

 (आणि अशी एकदां आपत्ति ओढवली होती म्हणतात. आमच्या गांवी एकदां नारसिंह अवताराचा अभिनय करतांना एक गांवकरी भंगट नट इतका आपल्या भूमिकेशीं तादात्म्य पावला कीं, हिरण्यकश्यपूची भूमिका घेणाऱ्या नटाचा तो खरोखरीं प्राण घेऊं लागला आणि मग श्रोतृवर्गातील कांहीं लोकांना रंगभूमीवर जाऊन बिचाऱ्या हिरण्यकश्यपूवेषधारी नटाला प्राणान्तिक संकटांतून वांचवावें लागलें ! पूर्ण तादात्म्याचा हा असा परिणाम होतो ! )