पान:विचार सौंदर्य.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

२९

वाङ्मयप्रबंध ऐतिहासिक, आधिभौतिक ज्ञान देण्याकरितां किंवा नैतिक उपदेश करण्याकरितां नसतात हें केळकरांनी अनेक ठिकाणी अनेक तन्हांनी सांगितलें आहे तें ध्यानांत धरण्यासारखे आहे. कीर्ति, अर्थप्राप्ति, सदुपदेश हे हेतु गौण व आनुषंगिक होत, ते प्रधान नव्हेत हें ध्यानांत न धरल्यामुळे कित्येक वेळां कवीचा इष्ट तेतु जो काव्यानंद देणें तो बाजूला राहून टीकाकार अप्रस्तुत गोष्टीं- बद्दल उगाच वाद घालीत बसतात. आतां नीतिदृष्टीची आणि काव्यदृष्टीची अगदीं फारकत आहे की काय, म्हणजे कवि, चित्रकार वगैरेंनीं नीति-अनीतीचा विचार न करता केवळ कलाविलास म्हणून पाहिजे ते वाग्विलास किंवा चित्रात्मक विलास करावेत काय हा मुद्दा विचार करण्यासारखा आहे. पण तत्पूर्वी केळकरांनीं याविषय जे सुंदर विवेचन केले आहे तें त्यांच्या बडोदें येथील व्याख्यानांतून लहान उतारा घेऊन सांगतो.

 “ कलाविलासाच्या मागें हेतुसंशोधनाचा गुप्त पोलीस लावून दिला तर अनर्थकारक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाहींत. वाङ्मयाला नैतिक प्रबंध म्हणणें आणि साखरभाताला नुसत्या साखरेचा केलेला भात म्हणणें हीं दोनहि सारख्याच समंजसपणाचीं होत. शिल्पशास्त्रांत कलेच्या दृष्टीनें निरनिराळे आकार बनविणें यांत प्रतिभाकौशल्य दिसून येतें. पण देवळाचें उंच शिखर सुंदर कां, तर तें आकाशांत ईश्वर आहे असें उंच बोट करून दाखवितें म्हणून, अथवा तीन तीन कमानींची जोडीच कां शोभते तर तिजवरून त्रिमूर्ति ब्रह्मा-विष्णू-महेश्वराची आठवण होते म्हणून, असें म्हणणें बरोबर होईल काय ? ताजमहालाच्या पांढऱ्या शुभ्र दगडांत जी रंगीबेरंगी कुसर बसविली आहे तिचा नैतिक हेतु शोधून काढणारानें ताजमहाल पाहण्यास जाण्याचे श्रम न घेतलेलेच बरे. चित्रकार पौराणिक किंवा ऐतिहासिक चित्रे रंगवितो तेव्हां त्याचा हेतु कलेच्या दृष्टीने सुंदर चित्रे रंगविण्याचा असतो कीं नीतिबोध करावयाचा असतो ? पोहावयास पडणारा मनुष्य जलक्रीडा करतो तो स्नानाच्या हेतूनें नव्हे. शिकारी क्षत्रिय अरण्यांत मृगयाविलास करतो ती एक दिवस चांगले मांस खावयाला मिळावें म्हणून करीत नाहीं ! गवई दीप-राग आळवितो तो अर्थशास्त्रदृष्टया मशालजीचा खर्च वांचविण्या- करितां नव्हे. तात्पर्य, 'अधिकस्याधिकं फलं ' या न्यायानें, कलेच्या दृष्टीनें वाङ्मय सुंदर असून त्यांतूनच नीतिबोध निघण्यासारखा असल्यास दुधांत