पान:विचार सौंदर्य.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५
अलीकडे महाकाव्ये का निर्माण होत नाहीत ?
सत्कमें किंवा दुष्कर्मे नाहीत; तर सर्वत्र अनिश्चय, संशय, ढिलेपणा, गुळमळीतपणा व चालढकलपणा दिसत आहे!*

हें मानसिक पृथक्करण सर्व व्यक्तींना पूर्णपणे लागू पडणार नाही. पण ज्या सुशिक्षित वर्गातून महाकाव्यें निर्माण करणारे किंवा वाचणारे निघावयाचे त्या वर्गांतील बहुतेकांना वरील वर्णन कमी अधिक मानाने लागू पडेल असे वाटते. हे जर खरे असेल,- ज्या उच्च, व्यापक, सोत्साह व आत्मप्रत्ययपूर्ण वृत्तीने व दृष्टीने पाहिल्याशिवाय महाकाव्याची निष्पत्ति होऊ शकत नाही ती दृष्टि अलिकडे फारशी दिसत नाही हे जर मान्य असेल तर महाकाव्यांच्या निर्मितीचे प्रयत्न का होत नाहीत व झाल्यास ते यशस्वी का होत नाहीत हे थोडेसें कळेल. अलौकिक 'प्रतिभा' हल्लीच्या युगांतहि हल्लीच्या युगाला रुचेल व पटेल असें महाकाव्य रचील यांत शंकाच नाही; पण प्रतिभेचा प्रश्न गूढ असल्यामुळे त्याचा विचार बाजूला ठेवून सामान्यदृष्टीने हे विवेचन केले आहे. महाराष्ट्रांतील हल्लींच्या कवींना, कादंबरीकारांना, नाटककारांना, निबंधकारांना, तत्त्वज्ञांना सामान्य दर्जाजी लहान लहान सत्ये व सौन्दर्यै दिसतात व ती त्यांना सांगावीशी वाटतात. आणि म्हणूनच काव्यक्षेत्रापुरते पाहावयाचे म्हणजे भावगीतादि लघुकाव्यप्रकार अलिकडे प्राचुर्याने दिसत आहेत. यांत अनुचित असें कांहींच नाही. उलट उच्चतर, गंभीरतर व व्यापकतर सत्याकडे व सौन्दर्याकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे व तो अभिनंदनीय आहे. * * *

  • वरील लेख भोरच्या युवराज-युवराज्ञीच्या 'निर्झरिणी' नांवाच्या कवितासंग्रहाला काही वर्षांपूर्वी मी लिहिलेल्या प्रस्तावनेंतला एक भाग आहो फग्युसन कॉलेजांतील प्राध्यापक रा. श्री.जोग यांनी 'लोकशिक्षण' मासिकाच्या ऑगस्ट १९४० च्या अंकांत महाकाव्याच्या अनिर्मितीची मीमांसा करतांन. विवेकवाद ( Rationalism) आणि अज्ञेयवाद ( Agnosticism) यांचा प्रसार हे कारण दिले आहे ते वरील विवेचनाशी सुसंगत आहे. काही वर्षांपूर्वी एका व्याख्यानांत दुसरी एक उपपत्ति सुचविली होती ती उल्लेखनयि च मननीय आहे. काव्यफूति ही अल्पकाल टिकणारी असते तेव्हा सावगीतासारखी लघुकाव्य निर्माण होणे साहजिक आहे असा त्यांच्या म्हणायचा आराय दिसतो. त्यांचे मत मला मान्य नाही. विस्ताराने चर्चा करण्यासारखे ते असले तरी आता ती करीत नाही.
९|८|४०                                                                                
                                                                                          वा.म.जो