पान:विचार सौंदर्य.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१३४ 

विचार सौंदर्य


 ‘संरक्षक' ही गोष्ट मानसशास्त्रष्टया फारच बहारीची आहे. त्रिवेणी आणि विनायक यांचें लहानपणापासून अत्यंत प्रेम पण दैवदुर्विलासानें तिचा दुसऱ्याशी विवाह झाला. त्रिवेणी ज्या शहरांत राहते त्या ठिकाणीं हिंदु-मुसलमानांचा दंगा, कांहीं दिवस चालू असतो आणि विनायक तिच्या संरक्षणाकरितां धावून जातो. पण विनायकाशी एकान्त प्रसंग आला असतां आपण मोहवश होवूं अशी त्या भावनाप्रधान युवतीला भीति वाटते आणि ती विनायकाला म्हणते, " विनायक, अगदर्दी खरं सांगूं तुला, मला परदेशांत भीति नाहीं. दंग्यांत भीति नाहीं. उभ्या जगांत मला एकाच व्यक्तीपासून धोका आहे. त्या व्यक्तीपासून माझं रक्षण तूं करशील?"

 "कुणापासून ? कुणापासून, सांग ?" विनायकानें अधीरपणें विचारलें.

 " विनायक, " ती म्हणाली," तुला वाटतं, माझ्या सौंदर्यामुळे मला जगाकडून धास्ती आहे. तुला असं कळत नाहीं, कीं जगांत दुसऱ्या कोणी अतिप्रसंग केला तर त्याची भीति नाहीं, कारण त्या वेळीं माझा मेंदू जागा असतो, पण तुझ्या स्पर्शात माझ्या शारीरिक आणि मानसिक विरोधी शक्तींचा लोप करण्याचें सामर्थ्य आहे; तुझ्या सान्निध्यांत असतांना हजारो वर्षाच्या संस्कृतीचे पाश खिळखिळे होतात, पातिव्रत्याची कदर वाटत नाहीं... आतां सांग, विनू, जगापासून माझं संरक्षण तूं करशील; पण तुझ्यापासून --नव्हे, माझ्यापासून, माझं संरक्षण करणं तुला शक्य आहे का ?"

 हें शेवटलें वाक्य आणि त्यांतल्या त्यांत 'तुझ्यापासून-नव्हे, माझ्या- पासून ' या शब्दांतील मार्मिकपणा शब्दानें कसा वर्णन करावयाचा ? गोष्ट संपविण्याकरितां वरील वाक्य लिहिल्यानंतर कृष्णाबाईंनीं देखील पुढे कांहीं लिहावयास नको होतें. गोष्टींतील पुढील परिच्छेद गाळला तर कलादृष्ट्या विशेष कांहीं हानि झाली नसती. 'शिकारी ' नांवाच्या शेवटच्या गोष्टींत ' बिचारं जोडपं ' हे दोनच उद्गारात्मक शब्द अखेरीस आहेत; या द्विशब्दात्मक उद्गारांनी जे काम झालं आहे तें आणखी एखादा परिच्छेद लिहूनहि झाले नसतें. कृष्णाचाईमध्यें उत्तम कलावन्तांत सांपडणारा असा संयम आहे म्हणूनच शेवटला तो परिच्छेद घालण्यांत