पान:विचार सौंदर्य.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अनिरुद्ध प्रवाह

१३५

चूक आहे असें म्हणावेंसें वाटतें. उगाचच्या उगाच गोष्ट लांबविणाऱ्यांचे दोष दाखविण्यांत अर्थ काय ?

 हा अभिप्राय लिहिण्यामध्यें मींहि संयम पाळला पाहिजे; कारण तो योजिल्यापेक्षां आधींच लांबला आहे. अध्यापन व अभिप्रायलेखन हा अर्धवट धंदाच ज्याचा झाला आहे त्याला मुलांचे व लेखकांचे दोष काढल्याशिवाय, मला वाटतें, चैनच पडत नाहीं. म्हणून मला ' अनिरुद्ध प्रवाह' हे पुस्तक फार आवडले असले तरी कांहीं दोष मी दाखविले. एरवीं खरें पाहिलें तर हैं पुस्तक वाचून झाल्यावर अगदी पहिल्याप्रथम म्हटल्याप्रमाणें मला सहसा न मिळणारा असा आनंद झाला होता. कथानक, रचनातंत्र, वगैरेंमध्ये जसें सुंदर आहे तसेंच भाषेच्या बाबतींतहि आहे. प्रस्तुत 'अनिरुद्ध प्रवाहां 'तील भाषेचा प्रवाह अनिरुद्ध आहे; तींत कृत्रिमता नाहीं; इष्ट संस्काराला बाधक होईल अशी उपमादिकांची रेलचेल नाहीं; पण योग्य ठिकाणीं माफक अलंकार आहेत.

                                        * * *