पान:विचार सौंदर्य.pdf/१२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१२२ 

विचार सौंदर्य

उचलली आहेस त्या अर्थी तूं उर्वशीलाहि लपवून ठेविली असली पाहिजेस." (हंस प्रयच्छ गे कान्तां गतिरस्यास्त्वया हृता । विभावितैकदेशेन देयं यदभियुज्यते ॥ ) सामान्य व्यवहारांत देखील समंजस बायका उसने दागिने घालीत नाहींत, कारण मग सगळेच दागिने उसने आहेत असें लोक म्हणावयाचे ! होतकरू लेखकांनीं या गोष्टी ध्यानांत धरून गौण भागांत देखील उसनवारी न करण्याची खबरदारी घ्यावी.

 'संदेश' 'वसुंधरा,' ' चित्रा ' वगैरे नियतकालिकांत विनोद करण्याच्या बुद्धीनें माझ्यावर जी टीका क्वचितप्रसंगी येते तिच्याकडे खिळाडू वृत्तीनेंच पाहावयाचें असतें. या टीकेंतील विनोद मला कित्येक वेळां आवडलेला आहे. पण असल्या टीकेमध्यें शास्त्रीय दृष्टीच्या धारवाडी कांट्यानें मोजलेले सत्य पाहावयाचें नसले तरी एक सहस्रांश तरी सत्य असावें लागतें हैं या टीकाकारांनीं ध्यानांत धरावें असें सुचवावेंसें वाटतें. त्याचप्रमाणें ज्यांना माझ्याविषयीं कांहीं माहिती नाहीं किंवा मला काय सांगावयाचें आहे हे समजण्याची ज्यांची पात्रता नाहीं त्यांच्या 'विनोदा - ला प्रसिद्धि देतांना त्या त्या जबाबदार व्यक्तींनीं विचार केला तर बरें होईल असें म्हणावेंसें वाटतें. ( बाकी मी टीका करण्यास पात्र होण्याइतका महत्त्वाचा वाटतों ही जाणीव थोडीशी आनंददायक असते हैं येथें कबूल करावेंसें वाटतें.)

 एकंदरींत ही 'विनोदी' म्हणून केलेली टीका मनाला विशेष टोंचत नाहीं, कारण बरेच वेळां त्यांत क्षणभर मौज करण्यापेक्षां टीकाकाराचाहि अधिक हेतु नसतो आणि आपणहि खिळाडू वृत्तीनें त्यांतील विनोदाचा आस्वाद घेऊं शकतो; कारण त्यांत विषाचा अंश कांहींच नसतो हे आपणांस ठाऊक असतें. विष असेल तर मात्र गोष्ट निराळी. एका व्याख्यानांत मी कोणता तरी मुद्दा सांगतांना गाढवाचा दाखला दिला होता. त्या व्याख्यानाचा रिपोर्ट देतांना 'संदेश' मध्यें

' वामनराव व गाढव '

असा मथळा देऊन विनोद उत्पन्न करण्याचा अच्युतराव कोल्हटकरांनीं प्रयत्न केला होता. त्यावर उत्तर देण्याकरितां एक पत्र लिहावें व त्या पत्राला