पान:विचार सौंदर्य.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
वाङ्मयकलाविषयक माझी दृष्टि


प्रा. फडके यांनी साहित्याचे दोन प्रकार मानिले आहेत. एक शिकविणारें साहित्य आणि दुसरें रिझविणारें साहित्य शिकविणारें साहित्य रिझविणारें होऊं शकेल. उदाहरणार्थ मेकॉलेचे निबंध, विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला, शिवरामपंत परांजपे यांचे कांहीं निबंध इत्यादि. त्याचप्रमाणें रिझाविणाऱ्या साहित्याला शिकविण्याचें वावडें नाहीं, त्यानें शिकविलें तर तें पाप आहे असे प्रा. फडके कधीहि म्हणाले नव्हते आणि म्हणत नाहींत. 'कलेकरितां कला' असें ज्यावेळी ते म्हणतात त्यावेळी त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ एवढाच असतो कीं, कलावन्तानें कलाकृति करतांना आपल्या कलेचे नियम आपण पाळतों किंवा नाहीं आणि आपली कृति सुंदर होते किंवा नाहीं याकडे मुख्यतः लक्ष द्यावें. आणि यांत गैर काय आहे ? साधीं घरगुती उदाहरणें घेऊन बोलावयाचें म्हणजे टेनिस खेळणाऱ्याानें टेनिसचे नियम सांभाळून डाव कसा जिंकतां येईल इकडे लक्ष द्यावें. प्रतिपक्षाचा पराभव झाला तर त्याला वाईट वाटेल की काय, त्याला हूल दाखवून चेंडू दुसरीकडे मारणें हें पाप आहे की काय, असल्या गोष्टींचा विचार करूं नये हें म्हणणें सरळ आहे. जेवतांना अन्न स्वच्छ, रुचकर, पचण्यासारखें आणि बलवर्धक आहे कीं नाहीं तें पाहावें, इतर गोष्टींचा फारसा विचार करूं नये, यांत गैर असें फारसे कांहीं नाहीं. तसेंच कलावन्तानें आपल्या कलेच्या दृष्टीनें विचार करावा इतर असंबद्ध विचारांच्या भोवऱ्यांत सांपडूं नये, हें प्रा. फडक्यांचें म्हणणें हिशेबी आहे. गुलाबाचें चित्र पाहिल्यावर त्यापासून कांहीं बोध मिळत नाहीं अशी कोणी तक्रार करतो काय ? बरें एखाद्या सापाचें, वाघाचें किंवा गाढवाचें हुबेहुब चित्र काढलें तर त्यावरहि कोणी आक्षेप घेत नाहीं. एखाद्या नग्न स्त्रीचें चित्र काढलें तर मात्र वादाचें वादळ उठतें. साहित्यामध्ये देखील असेंच आहे. एखाद्या गद्यलेखकानें