पान:विचार सौंदर्य.pdf/१०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१०६ 

विचार सौंदर्य

नये आणि आपण बरे आणि आपला मार्ग बरा अशी वृत्ति स्वीकारावी. तसेंच शेजारधर्म म्हणून होतां होईतों दुसऱ्यांशी जुळवून घ्यावयाचें; निदान जाणूनउमजून त्याला दुखवावयाचें नाहीं, यदाकदाचित् दुखवावें लागलेंच तर अगतिक स्थितींतच, कष्टानें, दुःखी अंतःकरणानें, क्षमायाचना- पूर्वक आणि शक्य तेवढ्या अल्प प्रमाणांत दुखवावयाचें, अशी वृत्ति स्वीकार- ल्यास कलालालसेला, नीतिप्रियतेला आणि सत्यजिज्ञासेला- सर्वांनाच हें धोरण हितावह आणि भूषणावह होईल. पण या अपूर्ण व त्रिगुणात्मक जगांत अशी सात्त्विक वृत्ति संभाळणें कठीण पडतें. नीतिप्रियता सात्त्विक भाव-भावनांचें श्रवण - मनन - निदिध्यासादि न करितां, दुसऱ्याचा आचार सुधारण्या- पेक्षां स्वतःचा आचार सुधारावा अशी वृत्ति न स्वीकारतां कलाविलासांचे खेळ पाहायला जाते ! जाते तर जाते, आणि पुन्हां दोषैकदृक् वृत्तीनें नाकें मुरडते- इतकेंच नव्हे पावित्र्यविडंबनाची वगैरे बोंबाबोंब करीत सुटते. असें नसतें तर श्री. कृ. कोल्हटकर यांच्या विनोदी लेखांत पावित्र्यविडंबन आहे अशी आरडाओरड का ऐकूं आली असती ? तसेंच नीतिप्रियतेला ज्ञानाच्या क्षेत्रांतहि लुडबुड करून नसते विधिनिषेध व नसत्या मर्यादा घालण्याची वाईट खोड आहे. अशी खोड नसती तर अमेरिकेतल्या एका संस्थानानें डार्विनचा विकासवाद शाळा-कॉलेजांस शिकविण्याची मनाई कां केली असती ? कलाप्रियता ही तर कलागती लावण्यांत मोठी कुशल आहे. तिला आपलें घर सोडून नीतीच्या खोलीकडे जावेंसें वाटतें आणि तेथें नीति-अनीतिविषयक प्रश्नांची आपल्या सामर्थ्यापलीकडची उठाठेव करावीशी वाटते; इतकेच नव्हे तर जरूर नसतां जातां येतां उगाचच आचार विचार-बालकांना चिमटे घ्यावेसे वाटतात. ज्ञानलालसाहि कांहीं कमी नाहीं. ती आपल्याच ' विवेका' च्या तोऱ्यांत असते आणि कला- नीतिविषयक भाव-भावनांना तुच्छ लेखिते आणि आत्मप्रत्ययजन्य सडेतोड- पणाच्या नांवाखालीं अविनय आणि बाष्कळपणा यांतच भूषण मानते. तसें नसतें तर देव, धर्म, नीति वगैरेंबद्दल बोलतांना कांहीं लोक आज जें व जसें बोलत आहेत ते तसें कशाला बोलले असते ? एका व्यक्तीच्या मनांत वावरणाच्या कलाप्रियतेला, नीतिप्रियतेला आणि ज्ञानप्रियतेला तरी कुठें गुण्यागोविंदानें नांदतां येत आहे, तर त्या समाजांत वावरूं लागल्यावर