पान:विचारसौंदर्य.pdf/९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

प्रतिपादितात ! कालौघाकडे जर कर्तृत्व असते, तर कालौघामुळे ' रामदास' व 'तुकाराम' अशी परस्परविरोधी कार्य कशी झाली ? दैन्याच्या, छळाच्या व दुर्दशेच्या काळांत ( व काळांतच नव्हे तर काळामुळे) निवृत्तिपर कवी झाले असें म्हणाश्याचे, तर छत्रपतींच्या राज्यारोहणाच्या काळांत, किंवा पेशवाईतल्या अटकेपार झेंडा नेणाऱ्या काळांत (व काळामुळे ) प्रवृत्तिपर कवी निर्माण व्हाव- यास पाहिजे होते. पण रामदासांशिवाय दुसरे नावच चटकन् डोळ्यांपुढे येत नाही. शिवाजीच्या पूर्वी हि महाराष्ट्राने 'पुलकेशी' राजाच्या द्वारे पराक्रम गाजविला होता; त्या वेळेस किंवा लगेच तदनंतर आशावादी कवी कोणते व किती झाले? परिस्थितीकडे कर्तृत्व मानले तर दुसऱ्या बाजीरावाच्या शिमगी चांदण्याच्या व मैना-राणूंच्या काळांत तमासगीर जसे झाले, तसे मोरोपंतासारखेहि कवि का निर्माण व्हावे, हा प्रश्न उत्पन्न होतो. परिस्थिति व व्यक्तिवैशिष्ट्य या दोहोंचा संघात किंवा व संयोग हैं कारण मानले तर वरील काही कू? काही अंशी सुटतील, अथवा खरे बोलायचे म्हणजे, सुटल्यासारखी वाटतील ! परिस्थिति कारणीभूत होत असली तर ती कशी होते हैं जोपर्यंत सांगता येत नाही तोपर्यंत तिचे कारणत्व स्वीकार- ण्यांत किंवा नाकारण्यांत विशेष अर्थच नाही. कार्यकारणभाव समजल्याचे माया- त्मक समाधान पाहिजेच असले तर परिस्थिति ही 'काही अंशी व एका अर्थाने ' कारणीभूत होते असे म्हणून मोकळे व्हावें !
 परिस्थिति कारणीभूत झाल्याची प्रो. वा. ब. पटवर्धन यांनी दिलेली काही उदाहरणे परीक्षणाकरितां घेऊ या. 'भोवतालची देशरचना जशी असेल त्याप्रमाणे कवितेची चालचलणूक असते' असे ते म्हणतात. आणि अर्थविवरणार्थ टीपेत अशी पुस्ती जोडतात की, 'भूप्रदेश, देशरचना आणि हवापाणी यांचे गुणक- र्माचा कवींच्या मनावर परिणाम होतो तो, त्या त्या कवींच्या स्वभावाप्रमाणे किंवा मनःप्रवृतीप्रमाणे भिन्न भिन्न होतो.' या सिद्धान्ताच्या द्वारे प्रो. पटवर्धनांना असें का सांगावयाचे आहे, की नित्य दिसणाऱ्या हिरवळीमुळे स्वभावांत हिरवटपणा येईल, किंवा प्रदेशाच्या रक्षतेमुळे स्वभावांत रुक्षता येईल किंवा उंच पर्वतांच्या सान्निध्यामुळे स्वभावांत उच्चत्व येईल, किंवा हिमालयाच्या जवळ राहिल्याने स्वभा- वांत थंडपणा येईल ? माझा हा प्रश्न विडंबनात्मक वाटेल व थोडासा आहेहि. पण विडंबन थोडेसें आवश्यक आहे, कारण पुष्कळ लोकांच्या मनांत या प्रश्नाच्या