पान:विचारसौंदर्य.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

नाहीत असे नाही. पूर्वीच राष्ट्रांराष्ट्रांमध्ये किंवा संस्कृती-संस्कृतीमध्ये लढे होते आणि अलीकडे ते लढे नष्ट झाले आहेत असेंहि नाही. चंद्रकला, तारका, उषा वगैरे पूर्वी जशा होत्या तशाच हल्ली आहेत. बायका पूर्वी सुंदर होत्या व अलीकडे कुरूप झाल्या आहेत असे नाही. सूर्यादि नवग्रह पूर्वी जसे होते तसेच हल्ली आहेत. काम-क्रोध-लोभादि षड्रिपूंनी हल्ली रिपुत्व सोडून शस्त्रसंन्यास केला आहे असे ऐकिवात नाही. मग महाकाव्याला अनुकूल विषय नाहीत या म्हणण्याचा अर्थ काय ? खरा प्रकार असा आहे की अभाव काव्यात्मक दृष्टीचा आहे; विषयांचा नाही. नैतिक दृष्टया ज्याप्रमाणे एखाद्याची विषयवासना क्षीण होते, पण विषय कधी संपले नाहीत किंवा संपाक्याचे नाहीत, त्याप्रमाणेच काव्यदृष्टयाहि विषय कधी संपले नाहीत व संपावयाचे नाहीत. काव्यदृष्टि किंवा काव्यात्मक वृत्ति असेल त्याला विषयांचा कधी तुटवडा पडला नाही, व पडणार नाही. प्रेमळ आईला बोबडया मुलाचे कौतुक करण्याला जसे हरघडी विषय मिळतात, किंवा प्रेममोहित तरुणाला ज्याप्रमाणे आपल्या प्रेमविषयक रमणीमध्ये क्षणोक्षशी रमणीय नवता भासमान होते, त्याप्रमाणेच लघुकाव्याला किंवा महाकाव्याला अनुकूल असलेली दृष्टि व वृत्ति ज्याच्यामध्ये आहे त्याला नवीन नवीन विषयांची वाण पडत नाही. पण सावत्र आयांना बोबड्या मुलामध्ये जहें कौतुकास्पद काहीच दिसत नाही, किंवा वेदाभ्यास- जड वृद्धांचे चित्त जसें युवतींच्या लीलांनी द्रवत नाही, त्याचेसुमाणे महाकाव्य- निष्पत्तीला आवश्यक असलेली दृष्टि व वृत्ति ज्यांच्यामध्ये नसते त्यांना अलीक- डच्या जीवनांत महाकाव्याला अनुकूल विषय मिळत नाहीत. काव्यनृत्य करूं शक- णान्याला तारांगण चालतें, रणांगण चालते, नृपोगाण चालतें, व स्मशानांतहि रुंडमालाधर शंकराप्रमाणे तो तांडवादि बीभत्स-भयानकादि रस उत्पन्न करणारे नृत्य करूं शकतो. उच्चतम काव्यनृत्य ज्यांना करता येत नाही त्यांना मात्र सर्वत्र वांकडींच अंगणे दिसतात, विषय दिसतच नाहीत व परिस्थितिच प्रतिकूल असते!
 परिस्थितीचा व काव्याचा संबंध काय या मुद्याचा वरील एका वाक्यांतच वास्तविक समारोप करता येईल. पण एतद्विषयक काही गैरसमज दूर करण्याकरिता थोडासा विस्तार करणे जरूर आहे. अलीकडे पुष्कळ लोकांना असे वाटते की, बन्याच गूढ गोष्टींचा कार्यकारणभाव आपणांस कळला आहे. कार्यकारणभाव- विषयक आपले अज्ञान कबूल करणे मनुष्यमात्राला केव्हांहि जड वाटते, म्हणून