पान:विचारसौंदर्य.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

किंवा रुसते, किंवा रागावते, अथवा क्षीण होते, या म्हणण्याला इतिहासाचा किंवा तर्काचा कांहींच आधार नाही. टेनिसन, ब्राऊनिंग, गटे (Goethe), हे काय अज्ञानयुगांतले आहेत, का ते अज्ञानी होते ? रवीन्द्रनाथ टागोर हे चांगले ज्ञानी, विचारी, अनुभवी व तत्त्वचिकित्सक आहेत; मग कवित्वाने त्यांच्याशी कशी गट्टी केली ? ज्ञानावर जर कविता-देवीचा राग असतो व अज्ञान जर तिला प्रिय असते तर ज्ञानविहीन बालक हा उत्तम कवि झाला असता व व्यास-वाल्मीकि इत्यादि पौरस्त्य कवि किंवा मिल्टन-शेक्सपिअर इत्यादि पाश्चात्य कवि यांनी वयोवृद्ध व ज्ञानवृद्ध झाल्यावर जी कविता केली ती कविता त्याज्य ठरली असती; पण तज्ज्ञांना तशी ती वाटत नाही ! कांही ज्ञानी लोकांमध्ये कवित्व नसते ही गोष्ट खरी आहे, पण कविल्वाभावाचे कारण त्यांचे 'ज्ञान' नव्हे, तर प्रतिभेचा अभाव हे होय. काही असंस्कृत माणसांवर कवितादेवीचा वरदहस्त असतो हैहि खरे, पण त्यांचे असंस्कृ- तत्व हे काही कवितादेवीच्या कृपाप्रसादाचे कारण नव्हे, तर त्यांचे सहृदयत्व हे त्याचे खरे कारण होय. केवळ ज्ञान हे काव्य निर्माण करू शकणार नाही; पण ते काव्यस्फूर्तीस विरोधहि करीत नाही; झाले तर उपकारक होते. 'कवि' याचा अर्थ एके काळी ' ज्ञानी' असा होता. (किं कर्म किमकर्मेति कवयोऽप्यत्र मोहिताः इत्यादि वचनांची येथे काही जणांना आठवण होईल.) विद्वान् असून कवि असलेल्यांची किती तरी उदाहरणे देतां येतील, व या उदाहरणांचा विचार केला असता असे दिसून येईल की विद्वत्व हे जसे सौजन्याच्या आड येत नाही, त्याप्रमाणेच विद्वत्व हे कवित्वाच्याहि आड येत नाही, कारण कवित्व है निराळ्याच गोष्टींवर अवलंबून आहे.
 बाल्यांतील मुग्धत्वाचे रम्यत्व कवींनी 'रम्य ते बालपण देई देवा' अशा रीतीने गावे पाहिजे तर त्याचप्रमाणे 'पाण्डित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत्' असे म्हणून वेदान्त्यांनी बाल्याचे एका दृष्टीने कौतुक करावें पाहिजे तर; पण व्यक्तीच्या किंवा जातीच्या बाल्यांतील अज्ञान व संस्कारहीनत्व ही कवित्वाला पूर्वी पोषक झाली किंवा इल्ली होतात असे मानण्यास आधार नाही हे ध्यानांत धरावें.
 शान हे कवित्वाला विरोधक नाही, तर उपकारक व उद्बोधक आहे असेंहि दाखवितां येईल, पण झाला आहे विस्तार तेवढ्यावरून वाचकांना बहुधा पटले असेल की, महाकाव्याच्या निर्मितीला अलीकडील ज्ञानवृद्धीने अडथळा केला आहे