पान:विचारसौंदर्य.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
साहित्य विषयक प्रश्न

म्हणाली. या वाक्यांत तालबद्धता आहे का नाही कुणास ठाऊक, पण यमक, उपमा, उत्प्रेक्षा वगैरे अलंकार नाहीत. तरी माझ्या हृदयांत त्या वेळी काय झाले ते माझे मला ठाऊक! हा प्रसंग खरा घडलेला, पण असला प्रसंग काव्यांत, कादंबऱ्यांत वगैरे कवीने वर्णिलेला वाचला तर भावनात्मक उच्चतम शोकरस उत्पन्न होईल. या काव्यांत ' अंगभूत' असा कोणताहि अलंकार नसला तरी चालेल; किंबहुना अलंकारांनी कदाचित् रसहानि होईल !
 विशिष्ट प्रसंगाचे वर्णन करून त्यावेळी वापरलेले अलंकाररहित साधे शब्द देखील रसोत्पत्ति करू शकतात याची अनेक उदाहरणे देता येतील. मृच्छकटि- कांतील शकार आपण खून करण्याचा प्रयत्न करून सवरून न्यायसभेत नुसते 'मी नाही केला' ( न मया ) असे म्हणतो ते शब्द; किंवा आथेल्लो शेवटच्या अंकांत दुष्ट इॲगोला जेव्हा तलवारीने वार करतो तेव्हां इोंगो “ I bleed, Sir; but not killed " (" मला जखम झाली आहे, पण प्राण वाचला आहे.") असे शांतपणे व निर्लज्जपणे बोलतो ते शब्द; किंवा उत्तररामचरितांतील सीतेने रामावि- षयी आदरपूर्वक उद्गारलेले " म्हणूनच हे रघुकुलाला भूषणभूत आहेत " अशा हे भावार्थाचे शब्द; किंवा रामाने आपल्या परिचारकाला " मला पूर्वीप्रमाणेच राम- भद्रच म्हणत जा " अशा आशयाचे सांगितलेले शब्द-यांत छंद नाही, यमक नाही; अलंकार नाही, कल्पनाविलास नाही, बुद्धिविलास नाही असे असतां तो तो रस उत्कटतेने उत्पन्न होतो. कित्येक वेळां तर कवी हे प्रसंगाचा असा बनाव जुळवून आणतात की, तेथें विशिष्ट पात्र तुटक तुटक चांचरत बोलते त्यांतच रस भरलेला असतो. आथेल्लोमधील ( Cassio) दारूच्या निशेत 'हा माझा डावा हात आणि हा माझा उजवा हात' असे अडखळत बोलतो ते, किंवा हॅम्लेटमधील ऑफिलिआ ही वेड लागल्यावर काहीतरी बोलते ते, वाचकांना येथे आठ- वेल. " ब्रह्म म्हणजे काय ? ” असे विचारल्यावर ब्रह्म है अनिर्वचनीय आहे हे स्वानुभवाने जाणणाऱ्या गुरूने जे मौन स्वीकारले ते देखील " गुरोस्तु मौनं ॥ व्याख्यानम् " अशा त-हेचे झाले ! किंवा ब्रह्मविषयक गहन गोष्टी सोडून व्यावहारिक गोष्टीविषयी बोलावयाचे म्हणजे एखाद्या निष्कपटी विद्यार्थिनीने भाबडेपणाने भलताच प्रश्न विचारला असतां गुरु में मौन स्वीकारतो तेंहि 'गुरोस्तु मौनं व्याख्यानम्" अशा त-हेचे असते. अशा प्रकारच्या मौनात्मक व्याख्यानांतहि

२३