पान:विचारसौंदर्य.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाकाव्ये

किंवा दुष्कर्मे नाहीत; तर सर्वत्र अनिश्चय, संशय, दिलेपणा, गुळमुळीतपणा व चालढकलपणा दिसत आहे.*
 हे मानसिक पृथक्करण सर्व व्यक्तींना पूर्णपणे लागू पडणार नाही. पण ज्या सुशिक्षित वर्गातून महाकाव्ये निर्माण करणारे किंवा वाचणारे निघावयाचे त्या वर्गातील बहुतेकांना वरील वर्णन कमीअधिक मानाने लागू पडेल असे वाटते. हैं जर खरे असेल,ज्या उच्च, व्यापक, सोत्साह व आत्मप्रत्ययपूर्ण वृत्तीने व दृष्टीने पाहिल्याशिवाय महाकाव्याची निष्पत्ति होऊ शकत नाही ती दृष्टि अलीकडे फारशी दिसत नाही हे जर मान्य असेल तर महाकाव्यांच्या निर्मितीचे प्रयल का होत नाहीत व झाल्यास ते यशस्वी का होत नाहीत हे थोडेसे कळेल. अलौकिक 'प्रतिभा' हल्लींच्या युगांतहि हल्लीच्या युगाला रुचेल व पटेल असे महाकाव्य रंचील यात शंकाच नाही; पण प्रतिभेचा प्रश्न गूढ असल्यामुळे त्याचा विचार बाजूला ठेवून सामान्यदृष्टीने हैं विवेचन केले आहे. महाराष्ट्रांतील हल्लीच्या कवींना, कादंबरीकारांना, नाटककारांना, निबंधकारांना, तत्त्वज्ञांना सामान्य दर्जाची लहान लहान सत्यें व सौन्दर्य दिसतात व ती त्यांना सांगावीशी वाटतात. आणि म्हणूनच काव्यक्षेत्रापुरते पाहवयाचे म्हणजे भावगीतादि लघुकाव्यप्रकार अलीकडे प्राचुर्याने दिसत आहेत. यांत अनुचित असे काहीच नाही. उलट उच्चतर, गंभीरतर व व्यापकतर सल्याकडे व सौन्दर्याकडे जाण्याचा हा एक मार्ग आहे व तो अभि- नंदनीय आहे.
 * वरील लेख भोरच्या युवराज-युवराशीच्या 'निर्झरिणी' नावाच्या कवितासंग्रहाला काही वर्षापूर्वी मी लिहिलेल्या प्रस्तावनेंतला एक भाग आहे. फयूसन कॉलेजांतील प्राध्यापक रा. श्री. जोग यांनी लोकशिक्षण' मासिकाच्या ऑगस्ट १९४० च्या अंकांत महाकाव्याच्या अनिर्मितीची मीमांसा करतांना विवेकवाद (Rationalism) आणि अज्ञेयवाद (agnosticism) यांचा प्रसार हैं कारण दिले आहे ते वरील विवेचनाशी सुसंगत आहे. त्यांनी काही वर्षापूर्वी एका व्याख्यानात दुसरी एक उपपत्ति सुचविली होती ती उल्लेखनीय वं मननीय आहे. काव्यस्फूर्ति ही अल्पकाल टिकणारी असते, तेव्हां भावगीतांसारखी लघुकाव्य निर्माण होणे साहजिक आहे असा त्यांच्या म्हणण्याचा आशय दिसतो. त्यांचे मत मला मान्य नाही. विस्ताराने चर्चा करण्यासारखे ते असले तरी आता ती करीत नाही.

९८५४०

वा. म. जो.

११