पान:विचारसौंदर्य.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
विचार सौंदर्य

आहे, आधिभौतिक शास्त्रांवरची उडालेली आहे, आणि सौंदर्य-विषयक औचित्यां- वरचीहि उडालेली आहे. पूर्वीच्या श्रद्धा, निष्ठा, भावना, कल्पना पार गेल्या असें म्हणण्यांत अतिशयोक्ति असेल; पण त्या जात चालल्या आहेत यांत काडीमात्र काही खोटे नाही. ज्या भाव-भावनांच्या व विचार-विकारांच्या प्रेरणांनी रामायणांतील व महाभारतातील व्यक्तींना त्या त्या प्रसंगी ते तें मानण्यास, बोलण्यास आणि करण्यास लावले, त्या भाव-भावना व ते विचार-विकार आतां जीर्ण होत चालले आहेत. राम-रावणांच्यासारखें युद्ध यापुढे शक्य दिसत नाही. कारण 'देव' नष्ट होत चालले आहेत व राक्षसांची जातहि नाश पावते आहे. आतां आपणांला सर्वत्र 'मानव' दिसत आहेत. गेल्या महायुद्धांत जर्मन लोकांना इंग्लिश लोक 'हूण' वगैरे शिव्या व्याख्यानांत व वर्तमानपत्रांत देत असत, पण हे सर्व ओठावरचे होते; पोटांत इंग्लिश लोक ओळखून होते की जर्मन लोक आपल्यासारखेच आहेत ! तसेच गेल्या सत्याग्रहयुद्धांत देव-दानवांच्या युद्धाविषयीं भारत रामायणादि कांत वर्णन केलेला प्रकार दृष्टीस पडत नाही, व पडणार नाही. कारण गांधी हे इंग्रजांचा द्वेष करूं नका असे स्पष्ट सांगत आहेत व इंग्रजहि गांधींना शिव्या देतांना आढळत नाहीत. हिंदुमुसलमानांचे दंगे अजून होतात, पण रामदासांना. किंवा शिवाजीला जे वाटत होते ते आपणाला वाटत आहे काय ? नीतीच्या बाबतीत हेच आणि रसिकत्वाच्या बाबतीतहि तेच. 'नागडा पंथ' जर्मनीमध्ये निघालेला वर्तमानपत्रांत आपण वाचतों, पण त्याबद्दल विशेष राग येत नाही. त्याचप्रमाणे प्रो. र. धों. कर्वे यांनी 'समाज-स्वास्थ्य' या मासिकावर नग्नप्राय स्त्रीचे चित्र छापलें, किंवा 'रत्नाकरा'नें “ओलेती" हे चित्र छापलें, तर त्याबद्दल आपण विशेष त्वेषाने बोलत नाही. मतभेदाचा हा प्रश्न आहे असे आपण समजतों व प्रश्न तेथेच सोडून देतो, झाले ! सध्यांच्या काळी आपली अशी मनःस्थिति झाली आहे की आपली कशावर विशेष उत्कट श्रद्धा नाही; निष्ठा नाही; नित्यत्वाने किंवा श्रद्धा नाही; भविष्यकाळावर विश्वास नाही; वर्तमानकाळात समाधान नाही; निश्चित सिद्धान्त नाहीत, निश्चित आकांक्षा व ध्येये नाहीत; निश्चित स्नेह किंवा द्वेष नाही; निश्चयाने मन आनंदविणारी किंवा दुखविणारी स्थळे किंवा कारणे नाहीत; निश्चयाने विशिष्ट लोकांना बळकट जोडणारी किंवा कायमची तोडणारी सत्कम

१०