पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कारण असेल या विषम संख्येमागे? स्त्रियांच्यात जीवनशक्ती जास्त असते का? आमची परिषद ज्या समाजकेंद्रात झाली होती, त्या मौलाफगावच्या केंद्रातही खूप वृद्ध स्त्रिया वसंतऋतू घालवायला आलेल्या दिसल्या. त्या मानाने पुरुष कमीच दिसायचे. आजींनी दिलेले उत्तर असे . पुरुष शिल्लक होते कोठे?
 आज सत्तरीपुढच्या लोकांना एकाकी जीवन सोयीस्कर वाटते. त्यांची मुलं. नातवंडे , सुना , लेकी अधूनमधून भेटून जातात . सारीच मंडळी नोकरी करणारी. त्यांच्या घरात आजींना करमत नाही . इथे अधिक मनासारखे जगता येते. आजींना मिळणारा वार्धक्य भत्ता या वृद्धाश्रमाचे भाडे देण्याइतका नाही. पण उरलेले पैसे मुलं भरतात. वेळेवर पैसे दिले नाहीत वा सबबीवर येथून घालवून दिले जात नाही.
 पश्चिम जर्मनीत हिंडताना खूप वृद्ध भेटले . मोझल नदीच्या काठावरच्या एका किल्ल्याच्या परिसरात एक विलक्षण दृश्य दिसलं. एक अगदी जख्ख म्हातारी , पांगळी आणि तिला धरून चालविण्याऱ्या दोन पंचाहत्तरीच्या वृद्धा. त्या तिला गोडीने चुचकारीत तर कधी वळजवरी करीत . बहुदा त्या तिला व्यायाम देत असाव्यात . वृद्ध वृद्धांना मदत करताना पाहिले, तरी मन कसनुसले.
 आणि तो ब्रेमन स्टेशनच्या दारात भेटलेला. म्हातारवावा, सुरेख व्हावोलिन वाजवून पैसे मिळवणारा! आमच्या घरी वर्षभर आमच्यातीलच. होऊन राहिलेल्या स्कॉटलंडच्या ब्राईडी रसेलचे उद्गार मला नेहमी आठवायचे . ती म्हणायची, शैला , तुमची कुटुंबसंस्था अजूनही खूप जिवंत आणि माणुसकीची आहे. ती अधिक सुदृढ व्हायला हवी. तुम्ही आमच्या पाश्चात्य देशातील स्त्रीमुक्ती चळवळीचा अभ्यास जरूर करा. पण तुमच्या मातीतच तुमच्या समस्यांची उत्तरं शोधा. स्त्रीचे स्थान कुटुंबात खऱ्या अर्थाने अधिकारी झाले, तर वृद्ध आणि लहान मुले यांच्या ज्या समस्या आमच्या देशात निर्माण होत आहेत , तेवढ्या त्या भयानक रूपात तुमच्या देशात निर्माण होणार नाहीत.
 आमच्या या जर्मन आजी दिसायला देखण्या आणि चोखंदळ . त्यांचा निरोप घेताना विद्या म्हणाली ,"तुम्ही सांगता म्हणून तुमचे वय त्र्याहत्तर म्हणायचे एरवी पन्नाशीच्या दिसता तुम्ही." दुसऱ्याच क्षणी उत्तरल्या त्या ,"अग! चार दिवसांनी येतीस तर तुझ्यापरिस दोनचार वरिसांनी मोठी दिसले असते. महिन्याच्या वावीस तारखेला मी माझ्या ब्यूटीपार्लरमध्ये जात असते. तेथे जाऊन आले की वीस वर्षांनी तरुण होते मी!" या उत्साही आणि तरुण आजीला मनात अगदी जपून ठेवलंय मी. आणखीन तीस बत्तीस वर्षानंतर अत्तरासारखी तेवढीच तरुण सोबत!
 इलाना आणि उदो हे ग्रेव्हन ब्रॉईशजवळच्या कॅपलेन या चिमुकल्या खेड्यात राहतात. आणि दोघेही डझलडॉर्फला नोकरीसाठी येतात. उदो तिथल्या अग्निशामक दलात नोकरी करतो.. तर इलोना एका कारखान्यात टायपिस्ट आहे .आमच्या वालसदनमधील चंदाचे हे काळजीवाहू पालक...फॉस्टर पेरेंटस् . मूलबाळ नाही. अवघं मन चंदात गुंतलंय . तिला भेटायला गेल्या चार वर्षात दोन वेळा भारतात येऊन

॥ ९४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....