पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 वृद्धांची समस्या आपल्याही देशात आहे .पण आपल्याकडे हरेक सामाजिक जखम झाकून टाकण्याची वृत्ती आहे आणि या सर्व सामाजिक जखमा झाकल्या-पाकल्यामुळे आतल्या सात सडून चालल्या आहेत . तो वृद्धाश्रम पहाताना गेल्या वर्षी ऋषिकेशला भेटलेली आजीवाई आठवली. लक्ष्मण झुल्याच्या अलीकडे अचानक मराठी शब्द कानावर आले . 'पांडुरंगा ,आमच्या देशाला वी पाऊस पानी हाय की न्हाई तूच जाने.' आणि आमची पावलं गचकन थांवली . मागे येऊन आम्ही आजीशेजारी बसकण घेतली.
 आजी सोलापूर-उस्मानाबादच्या खेड्यातली . नवरा तरुणपणी मेला . लेकरबाळ नाही. दहापाच वर्षे दिराच्या घरात कष्टात घालवली. एक दिवस दीर म्हणाला, वैनी गावातली माणसं देवाला जाताहेत . तुमीपण जा , मी पैसा देतो. यात्रा करताकरता सगळे हरिद्वारला आले. आम्ही केदारनाथ, बद्रीनाथ करून येतो. तवर तुम्ही इथेच थांबा. असे सांगून बरोवरीची मंडळी गेली. ती परत माघारी आलीच नाहीत.
 इस्टेटीचा वाद सोडविण्याचा खास मार्ग दिरांनी शोधून काढला. ही आजी गेली पंचवीस वर्षे इथेच आहे. १० वर्षापूर्वी एक मराठी भिकारी इथे आला. दोघे धर्माचे बहीणभाऊ एकमेकांच्या आधाराने त्या परिसरात रहातात .
 आमच्या घरात शहरातल्या आणि खेड्यातल्याही - वृद्धांना पूर्वी जी सुरक्षितता आणि पत होती. तो आज आहे का? या प्रश्नांचे प्रामाणिक उत्तर शोधून आपणही वृद्धांच्या प्रश्नांकडे नव्याने पहायला हवे.
 जर्मनीतल्या या आश्रमातील वृद्धांशी प्रत्यक्ष बोलण्याची व त्यांची निवासस्थाने पहाण्याची संधी मिळाली नाही.
 मग एल्केने आम्हाला दुसऱ्या वृद्धाश्रमात नेले. खरं तर माझ्या दृष्टीने खरा वृद्धाश्रम मी काही क्षणातच अनुभवला होता.
 एल्केच्या गावचा वृद्धाश्रमही अत्याधुनिक होता . इथे खोली पहाण्याची आणि एका वृद्ध महिलेशी गप्पा मारण्याची संधी मिळाली.
 आम्ही दारावरची वेल वाजवली तर आजी आमची वाटच पहात होत्या. आजीचे हे घर खूपच सुबक होते. दारातून आत शिरताच डाव्या हाताला सुसज्ज न्हाणीघर. उजव्या हाताला कपड्यांचे कपाट आणि त्यापलिकडे चिमुकले स्वैपाकघर . स्वैपाकघर म्हणणे अयोग्यच होईल . कुकिंग रेंज आणि त्याला लगटून एक विलक्षण गोंडस शेल्फ, त्यावर जाम, जेली, चहा , साखर यांच्या नखरेल बरण्या . शेल्फच्या खाली छोटासा फ्रीज . तळमजल्यावर जेवणाची सोय आहे . पण वेळ घालवायचा म्हणजे चहा, कॉफी वगैरे टाईमपास हवाच. एक सुबक खोली कम् दिवाणखाना कम् बेडरूम. या खोलीत आजीचे सारे कुटुंब भिंतीवर , कपाटावर विराजमान झालेले दिसले. आजींनी स्वतः खपून तयार केलेले आधे पेंटिंग्ज इ .नेटकेपणाने मांडले होते. या आजी वृद्धाश्रमातील सर्वात तरुण. म्हणजे फक्त त्र्याहत्तर वर्षांच्या आहेत. या वृद्धाश्रमात एकूण तीनशे जणांची सोय आहे. पैकी फक्त चाळीस पुरुष आहेत. बाकी स्त्रियाच आहेत . काय



आजीच्या प्रेमाची गोडी ॥९३॥