पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणखीनच खमंग व्हायची.. मग कुणाला कळणार नाही अशा अडगळीच्या खोलीत किंवा घरामागच्या पायऱ्यांवर बसून निवान्तपणा तो आंवटतिखट चव जिभेवर घोळवीत शाळेला आठवायचे . यंदा गणितात बढती मिळालेली. इंग्रजीत पोटापाण्यापुरन गुण मिळालेले . एकीकडे मनातल्या मनात लाज वाटत असे . पण दुसरीकडे नव्या वर्षात खूप अभ्यास करण्याचा निश्चय मनातल्या मनात होत असे . तर असे निश्चय करण्याचा, शाळकरी मुलांचा लाडका महिना... जून!
 पण मनाला रुखरुखही लागत असे . जून आला म्हणजे आंब्याचे दिवस संपत आल्याची जाणीव मनाला होई . ज्याला खरे आंवे म्हटले जात ते हापूस लहानपणी क्वचित खायला मिळत . एरवी रायवळ आंव्याचे तऱ्हेतऱ्हेचे नमुने बाजारात येत. हापूसची, आंब्याच्या राजाची चव चाखली उंवरगावात . हे समुद्रतटावर वसलेले चिमुकले गाव आमच्या आत्यावाईचे .तिच्या घरी आंव्याची प्रचंड वाडी होती. सकाळी उठल्यावर आम्ही तोंड खंगाळून थेट आढीत जात असू. तिथे आत्यावाई आणि काकांनी निरनिराळ्या तऱ्हेचे आंवे काढून ठेवलेले असत . आंवा जरा आंवट निघाला तरी आम्ही तो खुशाल फेकून देत असू. दिवसभर आम्ही आंब्याच्या खुराकावर असायचो. तरीही शेजारच्या वाडीतून , दगड मारून पाडलेल्या पाडाची गुळमट . आंबट चव जिभेवर चांदण्या गोंदवून जाई. आणि आज ? आंवे मिळतात किलोवर , शेकड्याचे युगही संपलेय. पूर्वी छकडी मापाने शेकडा एकशे वीसचा असे . आम्हाला आजी म्हणायची , "दळभद्री पोरं गं तुम्ही . आमचे काळी मुठीमुठीने काजूखिसमिसचा खाऊ मिळायचा. तुम्ही खा लिमलेट्या नि चाकलेट्या . आंवे , केळी , पेरवांनी लादन्या , काठ्या भरून जात. पण विकण्याचं शहाणपण नव्हतं हो . लोकांना वाटता वाटता दम लागत असे."
 आता आम्ही आमच्या नातवंडांना काय म्हणावयाचं? वंट्या एकच चमचा रस घे हं. पुन्हा रस मागायचा नाही ! उद्या पुन्हा चमचाभर देईन !
 आंव्यावरोवर आठवते वटसावित्रीची पूजा . माझ्या आजोळीच आम्ही असायचो. ज्येष्ठी पौर्णिमेला समोरच्या पार्लेश्वर मंदिरात सकाळपासून रीघ लागत असे. रेशीमसाडींचा लफ्फेदार पदर सावरीत , नाकातली नथ डाव्या हाताने नेटकी करती उजव्या हातातले जाळीदार झेल्याने झाकलेले तवक सावरीत सवाष्णी येत. त्या आमच्या आजोळच्या नांदत्या घरात , सवाष्ण या शब्दाचा अर्थ , नकळत्या वयात कळला. घरातल्या काही स्त्रिया लगवगणाऱ्या. वहारून कामे करणाऱ्या . तर काही नेहमीच पांढऱ्या साड्या नेसणाऱ्या , माझी मोठी मामी नि आजी कसनुसल्या सारख्या असत. इकडेतिकडे तोंड लपवित डोळे गाळणाऱ्या बायका. वटसावित्रीच्या दिवशी मीही रेशमी परकर नेसून आईवरोवर पूजेला जाई . वरोवर मावशी असे . माझ्या

॥ ७४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....