पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हा भाद्रपदाचा महिना



 आणि एक दिवस भादवा अंगणात येऊन उभा राही . आषाढश्रावणातल्या पावसाने अवघ्या जगाचे रंग बहरुन येत. झाडाझाहांतुन रेशमी पंखाचे मोर पंव फलामन. अलायला लागत. आषाढश्रावणातल्या उदंड बरसातीने सखावलेली नदी लेकुरवाळ्या प्रौढेसारखी अंगभन्न वाहू लागे. श्रावणातल्या पंचमीसाठी मेंदीची पाने ओरवाइनाना , पाटयावर बारीक वाटताना ,माझं मन अगदी आनून वाट पाही भादव्याची . मनात कितीतरी गाण्यांची सुरीली फुलपाखरं भिरभिर लागत .

भाद्रपदाचा महिना आला
आम्हा मुलींना आनंद झाला
पार्वती बोले शंकराला
चला हो माझ्या माहेरा ... महेरा
गेल्या वरोबर पाट बसायला
विनंती करू यशोदेला
टिपऱ्या खेळू गाणी गाऊ
प्रसाद घेऊ नि घरी जाऊ ... घरी जाऊ ...

 आमच्या चौकांनी घरात व्रतवैकल्यांना फारसा थारा नव्हता . गणपती , गौरी वगैरे दैवतं शेजारीपाजारी येत . नवरात्रातल्या एखाद्या रात्री शेजारी मंत्रजागराचा घनगंभीर समूहनाद मनात भरून जाई. त्या सर्वांची घरे अशावेळी उधाणून जात . पण आमचे घर मात्र शांतच असे. नाही म्हणायला श्रावणातल्या एका शुक्रवारी आई पुरणावरणाचा सुपोत स्वयंपाक करी. भांडी घासणारी चंद्राबाई नाहीतर पोळ्या करणान्या सुमाताईंना रांगोळी काढून , थाट करून जेऊ घाली. मनोभावे सव्वारुपया किंवा खण पुढ्यात ठेवी. त्या दिवशी माझ्या हट्टाखातर, जिवतीचा रंगीत कागद घरात येई. तो समोरच्या दुकानातून आणताना पिवळा, निळा की लाल रंगाचा आणावा है कळत नसे . येताना एक आण्याचा हार , दोन पैशांचा कापूर आणायचा. तो कागद भिंतीवर चिटकवून मी त्याची साग्रसंगीत पूजा करी. आईच्या माहेरी व्रतवैकल्यांचा लळा होता. पण या घरात आल्यावर ती पपांच्या विचारांत पूर्णपणे मुरून गेली होती . मात्र मुलाबाळांच्या समृद्धीसाठी, आरोग्यासाठी तिच्यातली भाविक आई श्रावणातल्या

॥ ६८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....