पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

चक्रावून गेलेली . तिथल्या कलाकुसरीत हरवलेली . भान आले तेव्हा एक गोरी ललना . बहुदा स्वीस असावी . मला मेंदीचा कोन दाखवृन, हाताचा तळवा पुढे करून खुणवीत होती. त्यावळी मेंदीचे क्लासेस वगैरे नव्हते. दुकानाच्या कोपऱ्यात जाऊन तिच्या हातावर मी जाळीदार सूर्यफुलांची नक्षी रेखाटली . केवढा आनंद आणि कृतज्ञता तिच्या डोळ्यात, शब्दात हाती ! कितीतरी वर्षे त्या हातांवरून वाहून गेली आहेत . आम्ही एकमकींना पूर्णपणे अपरिचित , तरीही किती जवळच्या . नेहमीच एकमेकींना आटवणाऱ्या !
 पहिली सर बरसून गेली की मलाही मेंदीचं खूळ लागतं. मेंदी का एरवी लावायला येत नाही? पण श्रावणातल्या उत्तररात्री रंगणाऱ्या मेंदीचा थाट काही न्याराच. श्रावणातला मेंदी खूप चढते म्हणे ! रंगते नाही , चढते . खरंखोटं मेंदीच जाणे! इतकं मात्र खरंय. माहेरचं लेकुरवाळं अंगण , एकीकडे चहाटळ वहिनींच्या चहाटळ गोष्टी ऐकत , कुणाची तरी चोरटी याद करीत , वहिनीनं चढवलेली मेंदी गहिरी रंगते.
 मेंदीचा शौक उत्तर भारतात जबरदस्त . त्यातल्यात्यात राजस्थानकाठेवाडात तर खूपच . विलक्षण कातीव रेषांची जाळीदार नक्षी हात भरून काढतात या ललना. मेंदीवर कितीतरी गोड गाणी लोकगीते रचलेली आहेत. घोळदार घागरा . त्यावर चंदेरी गोटा आणि टिकल्यांचं जरीकाम माथ्यावर विंदी , विंदीशी थवकलेली पिवळ्या ठिपक्यांची , लाल चुंदडी. हातभर लाखेचा लालम् चुडा. पायातल्या चार वोटांत साखळीच्या विछुड्या आणि रंगभऱ्या साजाला खुलवणारे मेंदीभरले हात हे सारंच कसं लोभसवाणं.
 राजस्थानी स्त्रियांचा कोणताही सण असो, मेंदीचा मान पहिला . लग्नाचे वा जेवणाचे आवतण द्यायला जायचे ते हिरव्याकंच मेंदीची खूण घेऊनच , लग्नात नववधूवरांना होमासाठी वसवताना त्यांचे हात मेंदीचा ओला गोळा हातात देऊन जोडून टाकतात . होम संपेपर्यंत मेंदी किती रंगली याची उत्सुकता सर्वांनाच असते. मग, मेंदी रंगली तर संसारही रंगतो म्हणा ! विच्चारी नववधू. कुणाचं लक्ष नाहीसं पाहून तळवा चोरून पहाते ती . मेंदी रंगली तर मनोमन हरखून जाते. आणि रंगली नाही तर?
 मेंदी म्हणजे अहेवाचं लेणे , तारुण्याची तरारी. नवेपणाची नवलाई. समर्पणाची गहिरी खूण. मेंदीचे शेलाटे तुरे जणू तारुण्याचे रूप. ताजेतवाने , ताठर अन् तकतकित . धरणीतून शोधून घेतलेले , तिन्ही ऋतूंच्या झोक्यांनी वहरलेले जीवरस , एका रात्रीत त्या रेशमी तळव्यांना समर्पून टाकायचे. त्यांना खुलवायचे. रंगवायचे, आणि हे सार करीत असतांना स्वतः मात्र विरून जायचे. म्हणूनच ही तरुणींना प्यारी, त्याच्या प्रीतीसाठी, कीर्तीसाठी अवघ्या आयुष्याचे उत्सव ! कधी कधी नव्हे तर नेहमीच मनात येते . मंजुश्री , मीना , शोभना यांच्या हातावरची मेंदी रंगली होती ना? की...?



मेंदी ॥६३॥