पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 की त्यांच्यातल्या मातृत्वाने ?
 वाऱ्याचा पदर धरून मन तरी किती खुळ्यासारखे झुलतेय?
 कुठून कुठवर आले मी!
 पण आता मात्र जांभळाची गोडांबी चव जिभेवरून पार उतरून गेली आहे. पावसाची झिमझिम सुरू होत आहे. लगबगत्या पावलांनी मैत्रिणी निघून गेल्या आहेत. मी नि हा त्या रसाळ जांभळीखाली उभे आहोत. थेंबाने तुटणाऱ्या पिक्या जांभळांचा सडा खाली सांडतोय. पहिल्या पावसाने सृष्टी बहाराला येतेय. पावसाच्या असोशी स्पर्शाने शहारून जाणारी धरती . इवलेसे हिरवे रेशमी शहार ... जणू जांभळीच्या झाडाखाली कुणीतरी ढोल वाजवतोय. आमंत्रण देतोय . साद घालतोय. पण या ढोलाच्या नादाने बेभान होण्याच्याही पलीकडे 'ती'चाललीय. कधी हे नाद ऐकू येतील, साद घालतील तिला? तिच्या मुक्या पावलात कधी भरून जाईल ही लय? कुणास ठाऊक!

܀܀܀

॥ ६० ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....