पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिवस , सारे तोंडपाठ!
 आम्ही उभ्या आहात नी नानांचा जांभळ . ही मृग लागताना पणात येऊन रसाळते. तर हिरुकाकांची जांभूळ शाळेत संस्कृतच्या पुस्तकात भेटली होती. जांभूळवनाच्या काठाने वहाणारा तुडुंब झरा . पिकलेली जांभळं त्यात टपटपत नि मग पाण्यातले मासे ... एकटक जांभळाकडे पहात जिभेचं पाणी नि जांभळं वरच्यावर मटकावीत. त्याचा आवाज होई ,
 गुलुगुग् गुलुगुग् ... गुलुम् गुलुग् ...
 ... जंबू फलानि पक्वानि पतन्ति विमले जले
 तानि मत्स्यानि खादन्ति गुलुगुग् गुलुगुग् ... गुलुग् गुलुग्॥
 माशांना जे रसिकपण लाभले ते आम्हाला का लाभू नये? परदेशातल्या चेरीबहराचे रसभरीत वर्णन आम्ही तोंड भरून करणार . जांभळींचे बहार किंवा पळसफुलांचे नक्षत्रलेणे आमच्या साहित्यिकांनी शब्दात साठवले आहेत. नाही असे नाही . पण आम्ही सामान्य माणसे निसर्गाच्या या रसरंगाच्या उधळणीकडे निवांतपणे ,कौतुकभरल्या नजरेने पहातो का ? बोरांच्या दिवसात रानातल्या बोरीकडे पाहुणचार घ्यायला जायचे कितीजणांच्या मनात येते?
 हुर्ड्याची आमंत्रणे कमी व्हायला लागली आहेत. इळाआवसेला, शेजारपाजारची लेकरंबाळं घेऊन रानात जेवायला जाण्याचे कुळाचारही हळूहळू नाहीसे होत आहेत. आणि वोरीची,जांभळीची झाडं तरी कितीशिक शिल्लक आहेत?
 नानांच्या शेतातली ही जांभुळही वच्छाच्या हट्टामुळे टिकली. नाहीतर तीही कुणाच्यातरी लाकडाच्या वखारीत जाती !
 आमचा जांभुळ अध्याय सुरू असतानाच अनेकजणींची भेट होत होती. कोणी शनवारच्या बाजारात माळवं ,भाजीपाला विकायला घेऊन जाणाऱ्या. तर कोणी शेताकडे लगबगीने निघालेल्या . डोक्यावरचा जड भारा तोलीत माझ्याशी दोन शब्द ओलावून बोलणाऱ्या. मी आपली त्यांना खुळचट आमंत्रण देतेय , या जांभळं खायला. (जसं माझ्या आजोळचंच झाडं !)
 "खा तुमीच. शेहर गावच्या मानसांले जांभळाचं कौतिक. खाऊन खाऊन वासनाच मेली वं आमची!" एक.
 "वासना मराय काय झालं ग? हर साली जांभळीची चव न्यारी लागती. पन येळ हाय का? अशा जांभळं खात पेंगत राहिलो तर मग झालंच! काम कोन उरकील? त्यो दादाप्पा?" दुसरी.
 "ताई , खाऊशी वाटली ना तर चारदोन पदरात टाकतो नि मग म्होरं कोनी नाईसं पाहून तोंडात टाकतो. पोर जिन्नस हाई, तंवरच पोरींची मज्जा असतेया. खेड्यातली पोर एकदाका शानी झाली की समदं संपलं. कसल्या बोरी नि कसल्या

॥ ५८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....