पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करायला सागा . बारीकसारीक. नाजुकसाजुक कामाचा मात्र कंटाळा
 "आज जग फ्रीज पुसता का अनुबाई ?" असं विचारलं तर रोखठोक सांगतील . "बाई तसली बारिकीची कामं नगा सांगत जाऊ.. लई भ्या वाटतयं बघा . आमची वैनी वी मला भाजी चिराया बसले की दहांदा सांगती की वन्सं फोड जरा बारीक धरा. मला दणदण भाकरी थापायला सांगा . फरशा पुसावा सांगा . रानातली कामं सांगा . धुणं धुवाया मांगा , पयला नंबर काढीन मी , पन नाजूक काम म्हटलं की जीवच लई घाबरा हुतो. वाटतं फुटतं की काय. हापटतं की काय . छातीत धाडधाड होतंय वघा."
 तिच्या या आगाऊ बोलण्याला वैतागून मीही फ्रीज पुसता पुसता म्हणते, "अहो शिका मग. माझ्या पाच माणसांच्या संसारात कुटून आणू असली मोटी कामं? कधीतरी भाजी चिरुन पहावी . खिडक्या नीटनेटक्या पुसाव्यात."
 त्यावर वाईचं उत्तर तयार . "वाई सोबतचा संसार करायची वेळ आली असता ना. तर समदं शिकले असते मी. पन हुवा जलम भावांचा संसार करण्यात गेला . आता कितीक दिस राहिलेत माझे? न्या झालं निभावून . आन हे वगा , म्होरल्या जलमात बी तुमच्याच घरी कामाला ऱ्हाईन . पन लगीन होन्या आगुदर बरंका . मग समदं वारीक , नाजूक काम शिकवा, आनं द्या लावून लगीन वी तुमीच ! चांगल्या नवऱ्यासंगं!" असं बोलून दिलखुलास हसणं.
 अनुवाईला असं मनभरून हसता येतं म्हणूनच ती स्वतःची दु:खं विसरू शकते. अनुवाईला तिच्या पवारीपणाचा काठोकाठ अभिमान आहे. मी कधी कधी मुद्दाम चिडवते तिला . "अनुवाई , पवारीण कशा हो तुम्ही ? भिशीण म्हणा की ! सासरचं आडनाच भिसे ना तुमचं?"
 अनुवाई उसळून उत्तर देणार. "हात त्याचा मुडदा वशीवला. कोन कुटला भिशा आनला हो? माजून धा दिस तरी नांदविलं का त्या दादल्यानं मला? आन नांदवणार तरी कसा? पुरुषात तरी जिम्मा होता का त्यों? नव्हता असं समदी म्हणतात. देवालाच म्हाईत ते. मला तरी कुठं अनुभाव हाय? माजा जलम पवारांच्या दारात गेला. मग पवारीणच की मी."
 एक दिवस थोडा अगोचरपणा करुन मी तिला म्हणालेच , " अनुवाई , उभा जन्म पवारांच्या अंगणात का घालवलात! पाट का नाही लावून घेतलात? तुमच्यात पाटाचं लगीन होतं ना?"
 तशी अनुवाईनं हातातलं काम टाकून दिलं आणि माझ्याकडे पहात ती कळवळून वोलली . "आता काय म्हणावं वाई तुम्हाला? एक डाव वोलला . पुन्ना नगा असं बोलू. पाटाची वाई काय पतिवरता असते? अवं कसा का असंना, घेवावामनासमुर त्याच्या पदरात टाकलं होतं मला माझ्या मायवापांनी. येक दिवस बी त्यांच्यासंगं सौंसार केला न्हाई मी . पन कितीवी झालं तरी नवरा व्हता त्यो. त्याची सर पाटाच्या नवऱ्याला



बेशरमीची झाडं ॥५५॥