पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 "देखो ना. चार दिनमें कितना उखाड दिया है आंगन. और घरमें देखो ! एवढी मेहनत करून चूल घातली मी . नुसती इखरून विखरून टाकलीय . वाई विना कळा नाय घराला." मी नुसती तिच्याकडे वघत राहिले. बहुधा माझ्या नजरेने तिला प्रश्न विचारला असावा.
 तू आलीस सकीना? आपल्या पायांनी ? पराभूत होऊन?
 ती हातातला झाडू कमरेशी धरुन जवळ आली. हलक्या आवाजात वोलू लागली , "भाबी , माँ के घरमें कौन है अपना? इनके पल्लोमे डाल दिया है . इधरीच ठीक है . आन जाणार कुठे? मी मेले तरी यानला वायकू भेटेल . पन पोरानला माय मिलेल का?
 "तुमी एवढ्या शिकला. भाईर जाता , भासनं देता. पन दादा वसकतातच की तुमच्या अंगावर ! हम औरताँ तो क्या, बेशरम के झाडा है...आम्ही बाया, बेशरमीची झाडं आहोत. किती वी तोडा, किती वी कापा , अमाले पानं फुटायचीच!"
 वेशरमीची दिशाहीन , रसहीन , निस्तेज पण जिवंत झाडं . इथे तिथे जीव धरुन जगताना पाहिली की जीव गुदमरून जातो. वाटतो ,
जुई कळ्यांनी आपले श्वास किती कोंडून घालायचे?
अनुबाई
 "वाई तुमचा परकल कसा पांढराफेक सोवच्छ धुतला वघा मी. या ना भाइर वगायला . दादांची पँट वी घासू घासू धुतलीया." अनुमावशी बाहेरून हाक मारीत वोलल्या.
 मी बाहेर गेले . दोरीवरच्या कपड्यांकडे डोळाभर कौतुकाने पहात ही वाई उभी होती . एकाच दिवशी भलामोठा धोवीघाट उरकल्याचा शीण कपाळावरच्या घामावरून काय तो जाणवत होता.
 अनुमावशीची लहर असते. कधीकधी धुवायला टाकलेले कपडे त्या खुशाल घडी घालून खणात ठेवतात . तर लहर आली की चादरीसकट सगळं घरदार धुवायला काढतील. सगळा दणका एकाच दिवशी उडवून देतील . वाईचा कामाचा उरक जसा जबरी तसा आवाजही जणू हजार पॉवरचा वल्व . मला नेहमी सांगावं लागतं, मावशी जरा हळू बोला . घशाला त्रास होईल तुमच्या. त्यावर त्यांचं ठोकर आवाजात मावशीचं उत्तर मिळणार ,"माझ्या घशाला लागलीय धाड !".
 स्वारी रंगात आली की खास आवाजात ओरडणारच. "बाई भाइर या. पितळेचं टीप कसं चक्क केलंय. तुमचं इस्टील झक मारील याच्या म्होरं."
 रुंदबंद दगडी वांधा . उंची भरपूर . भव्य कपाळ , गव्हाळ रंग , हसणारे बोलके टप्पोरे डोळे . कोऱ्या कपाळावरचं हिरवं गोंदवण आणि दणकट वागणंबोलणं, अशी ही आमची अनुमावशी, अनुसया पवारीण . कामाचा उरक दांडगा. पण ठोक कामच

॥ ५४ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....