पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांना कोणी जाग आणायची?
सकीना
 ही सकीना. चार मुलांची आई काळीसावळी हातपाय फुलवातीगत काटकुळे, केस नेहमीच पिंजारलेले . फंकर मारली तर उडून जाईल अस शरीर उदास डोळे , कधी कधी कुठेतरी हरवून जाणारे पण ओठावर मात्र हलकस हसू नेहमीच रेंगाळत असतं.
 हिचा नवरा ममदू. मजुरी करतो. कधी कधी रिक्षापण चालयता दिवसाकाठी दहापाच रुपये कमावतो. पण सहा माणसांचा ससार एकट्याला रेटत नाही. मुल नेहमीच भुकेली असतात. इतर रिक्षावाल्यांपेक्षा ममदू जरा वेगळा आहे तो मोर्चात पुढे असतो. सभांना आवर्जून जातो. कुणा रिक्षावाल्यावर अन्याय आला तर हा त्याच्यासाठी वणवण करतो. त्याच्या झोपडीत दोन फोटा अगदी कोवळ्या मनाने जपलेले आहेत , एक आहे राममनोहर लोहियांचा . कुठल्यातरी मासिकावर आलेला हा फोटो त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीत सुरेखपणे बसवलायं आणि दुसरा त्याचा स्वतःचा . कोणत्या तरी सत्याग्रहाच्या वेळी घेतलेला.
 तो शुद्धीवर असला तर त्याच्या गप्पा काम वाजूला ठेवून ऐकण्यासारख्या असतात. पण तो शुद्धीवर असणं हे कधीतरीच घडणार! त्यांच्या झोपडीशेजारी माझं दगडविटांचं घर आहे . ही झोपडी त्यांनी एका दिवसात उभी केली. ममदूने लाकडं आणून टाकली. पोरांनी नाल्याच्या कडेला उगवलेल्या वेशरमीच्या लवचिक फोकांचा ढीग जमवला . ही बेशरमीची झाडं कुठेही उगवतात . जरासं पाणी मिळालं की वस!
 जांभुळफिक्या रंगाची फुलं अंगाअंगांवर फुलवीत शेतांच्या , पांदीच्या कडेने बेशरम उभी असते . कितीही तोडली तरी तिला धुमारे फुटतच असतात. या वेलींची उभीआइवी वीण विणून सकीनाने झोपडीचे पट विणले . शेणमाती कालवून ते लिंपून घेतले . उकिरड्यावर पडलेले आरशाचे तुकडे आणून ते मातीत मढवून भिंतीत बसवले . एक तुकडा बाहेर नि एक आतल्या खोलीत. त्या दिवशी मी सारखी खिडकीत येऊन उभी राही.
 झोपडीचं... उभ्या राहणाऱ्या झोपडीचं कौतुक पहाताना मला राम-सीतेच्या झोपडीची आठवण झाली. ती पण अशीच असणार ! लक्ष्मणानं लाकडवेली आणून टाकल्या आहेत , राम लाकडाची मेख रोवतोय , सीता मातीचा चिखल करतेय...
 झोपडी उभी राहिली . ममदून अंगण दाबून घेतलं. सकीनाने शेणाचा दाट सडा घातला. माझ्या नि तिच्या लेकींनी रांगोळीची चित्रे अंगणात रेखाटली. रात्री सुखावलेली सकीना म्हणाली, "भावी, तुमी शेजार दिलात .लई चांगलं केलं. आता यानले तुमचा नि दादांचा धाक ऱ्हाईल. दारू कमी व्हईल. माजा मार टळेल . पोरं सुखानं घास खातील , भौत अच्छा हुआ." चारआठ दिवस कसे छान गेले ! एक दिवस

॥ ५२ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....