पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अडाणी बाई काय नोकरीधंदा करणार होती ? तिने हाती पोळपाटलाटणे धरले. मारवाडी समाजात ब्राह्मणांना खूप मान देतात. ज्या घरी ती स्वैपाकाला राहिली, त्या शेटजींनी तिला वहीण मानले. घरच्या स्त्रिया तिला रसोईवाल्या बाईजी या नावाने वोलवीत. मान देत. हे काम इज्जतीचे होते. त्यांच्याच वाड्यात एक खोली आम्हा मायलेकींना दिली होती. त्या घरच्या लेकरांबरोबरच माझेही नाव शाळेत घातले गेले. वर्गाची एकेक पायरी सहजपणे चढत गेले. लहानपणापासूनच मला घरकामाचा फार कंटाळा. अभ्यास मात्र मनापासून आवडे. दरवर्षी वर्गात मी पहिली येई. पण माझ्या हुशारीचं कवतीक ना माझ्या आईला की ना तिच्या मालकिणीला . लेकीच्या जातीनं कसं भरपूर काम करावं, शिळंपाकं खाण्याची सवय ठेवावी असं त्यांना वाटे. मी कळती झाल्यावर माझ्या लक्षात आले की जर मी कामाला हात लावला नाही तर माझं शिक्षणही बंद होईल. त्या धास्तीने मी घरकामही रेटून करू लागले. रात्री अभ्यासासाठी जागू लागले. दहा माणसांचं घर. त्यातून बड्या मालदाराचं. नेहमीच पैपाहुण्यांनी भरलेलं. त्यातून आमचा समाज धार्मिक. बारा महिन्यांचे अठरा सण. व्रतवैकल्यांची तर खैरात असे. माझी आई मला पूजापाठ कसा करायचा, कहाण्या कशा सांगायच्या, कोणत्या व्रताला कोणता स्वैपाक करायचा, त्याची बारकाईने माहिती देई. त्या तसल्या वातावरणात मी सातवीला वोर्डात पहिली आले. मालकांचा धाकटा मुलगा पुण्याच्या लॉ कॉलेजला शिकायला होता. त्याला माझ्या हुशारीचे अप्रुप वाटे. तो सुट्टीला येताना माझ्यासाठी पुस्तकं आणी.. मॅट्रिकला ७९% गुण मिळवून मी पास झाले. हट्टाने कॉलेजला गेले. मालकांचा मुलगाही वकिली करू लागला होता. त्याच्याहून मोठा मुलगा दुकानावर असे. दुकानाच्या प्रचंड नफ्यापुढे वकिलीचे पैसे त्यांना चिरीमिरीसारखे वाटत. "म्हाका वकिलसाव दिनभर वड्डीबड्डी किताबां बाँचर थक जावे. कोरटमा जार आया की, व्याका काळा कोटमा देखण जावाँ तो दसकी पत्ती भी कोनी मिलवाकी .( आमचे वकीलसाहेब जाडजाड पुस्तकं घेऊन बसतात, पण कोर्टातून आल्यावर खिसा चाचपावा तर दहाची नोट देखील त्यात सापडत नाही !") अशी कुचेष्टा त्यांची भाभी आणि इतर मंडळी करीत. त्यांच्या मनात माझ्याविषयी नाजूक भाव असावा. एक दिवस तो कॉलेजच्या कॉर्नरवर मला भेटायला आला. पण काय बोलावं हे त्यालाही कळलं नाही आणि मलाही कळलं नाही. हृदयातील ती वेगवान थरथर ... प्रचंड वादळात सापडलेल्या सायलीच्या वेलीसारखी. ती मात्र अजून आठवते. "
 वोलता बोलता रेणू क्षणभर थांबली.
 "आम्ही कॅन्टीनमध्ये चहा प्यायलो. आणि काही नाही. बस्स ! परीक्षा जवळ येत होती. डॉक्टर होण्याची नशा माझ्यावर चढत होती. थंडीचे दिवस संपले होते आणि शेटजींना पुण्य कृत्य करण्याची लहर आली. शेटजींना. विशेषकरून



उत्तराच्या शोधातले प्रश्न ॥४७॥