पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 मला वाटलं दुकानातल्या मुनीमावरोवर दिली असेल चिठ्ठी.
 "बाईंना सांगा मी निश्चित येण्याचा प्रयत्न करते. पण वाट पाहू नका. त्याच्याजवळ तोंडी निरोप दिला, तशी आग्रहाच्या स्वरात तो म्हणाला. "सचिनच्या ममीनं लई आग्रेवानं बोलिवलंय. तिचा हिरमोड करू नका. जरूर या. येताव आम्ही. " तो छपरी मिशीवाला तरुण चहापाणी न घेताच निघून गेला.
 रविवारी रेणू आमची वाटच पाहात होती. तिच्या उत्साहाला उधाण आले होते. सारखी हसत होती आणि धावतपळत होती. ऊस आणा, हुळा आणा, कोवळी वाळकं आणा.. असा घोष चालला होता. मी त्या वातावरणाने काहीशी सुखावून गेले.
 "रेणू, या आडगावात तुला पाहून खूप आश्चर्य वाटलं आणि वरंही वाटलं. अशा गावात खूप काम करू शकशील तू. पण इथवर पोचलीस कशी ? "
 "दीदी, धनवान माणसांच्या दानधर्म करण्याच्या रीतीही अशा असतात की त्या ओझ्याखाली माझ्यासारखीचा वळी सहजपणे दिला जातो." रेणू वरकरणी हसत होती, पण स्वर दुखावलेला होता.
 " मी नाही समजले तुझ्या बोलण्याचा अर्थ." मी म्हणाले. खरोखरच मला तिचे बोलणे उमगले नव्हते.
 "दीदी कशाला जुन्या जखमा उकरून काढू मी? तुम्ही भेटलात. आलात. कित्येक विषयांवर मनसोक्त गप्पा मारल्यात जीव सुपाएवढा झालाय माझा. आज आनंदाचा दिवस आहे. आज नकोत त्या जुन्या आठवणी ! एकेकदा राख फुंकरून निखारा फुलवला की तो लवकर शांत होत नाही.." रेणुकाला स्वतःविषयी बोलण्याची इच्छा नव्हती. मीही विषय बदलला.
 त्या दिवशी निमंत्रणाची चिठ्ठी द्यायला आलेला तरुण तिचा नवरा होता. तो स्वतः हुर्डा भाजायला बसला होता. अत्यंत नरम आणि गोड असा मऊचा हुर्डा खोवऱ्याची चटणी. साईचं दही कोवळा वाळकं. ओला टहाळ. रानातला मेवा समोर होता. माझी मुलं या नव्या मावशीवर खूश होती. माझं मन मात्र रेणूच्या मनाचा वेध घ्यायला उत्सुक होतं. तिच्या तुटक वोलण्याने

आतून हबकले होते.
 चतुर रेणूच्या ते लक्षात आले असावे. तिने हलक्या आवाजात मला विनवले. "दीदी, नाराज नका होऊ. औरंगाबादला येईन तेव्हा डोक्यावरचं ओझं तुमच्याच समोर मोकलून बसणारेय मी. डोक्याला हा भार कधी कधी पेलवत नाही. खूप बोलायचंय मला तुमच्याशी. खूप"
 आणि एक दिवस खरोखरच रेणू आली. मुलं घरी ठेवून आली. रात्रभर राहिली. रेणू बोलत होती नि मी ऐकत होते.
 "...मी आइच्या पोटात होते तेव्हाच माझे वडील वारले. जेमतेम सोळा वर्षाची होती आई. ब्राम्हणाची जात आधीच सनातनी त्यात तिच्या माहेरी दारिद्र्य ती

॥ ४६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....