पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, असं आज तरी वाटतंय. पण एवढ्याशा गोष्टीवरून अब्बांचं मन दुखवू नकोस. हजारो वर्षापासून स्त्रिया अशाच बुर्का घालीत आल्या आहेत. वुर्का पहनल्याने तुझी बुद्धी थोडीच कमी होणार आहे? त्यातून रज्जाकमियाँ इथे नाहीत. ते आल्यावर यातूनही मार्ग निघेल . पण या क्षुल्लक गोष्टीचा वृाऊ करून स्वतःचं मन जखमी करून घेऊ नकोस आणि घरच्यांनाही समजून घे."
 तिच्या मनाच्या जखमा वडिलांना दिसत होत्या. पण ते तरी काय करणार होते ? मोहसिनाने बुका शिवून घेतला. तो घालून ती कॉलेजात जाई. पाच मिनिटांच्या अंतरासाठी तिने रिक्षा ठरवली. रिक्षावाला तिचा दुरून भावसभाऊच.
 "आपा ये अच्छा किया आपने," त्यानेही खुशी व्यक्त केली.
 आपल्या सहकारी प्राध्यापिकांच्या समोर यायलाही तिला संकोच वाटू लागला. आपण पराभूत झालो आहोत, अशी तिच्या मनाला टोचू लागली. ती मैत्रिणींना टाळू लागली.
 सुटीला चार दिवस माहेरी येताच माझ्याकडे धाक्तपळत आली. खांद्यावर डोके ठेवून रडली. तिला बुर्का घालावा लागतोय यामुळे ती दुःखी नव्हती. तिचं दुःख दुसरंच होते.
 "मॅडम, माझ्या माणसांचं मन राखण्यासाठी मी जरूर हा बुर्का घालीन. पण मर्यादा आपल्या वागण्यात, नजरेत नसते का? इतर मुली नाटकात भाग घेतात. गाणी म्हणतात, खेळतात, वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होतात. भरपूर बक्षिसं मिळवून पुढील जीवनात सुंदर स्वप्नं रेखाटतात. पण आम्हाला मात्र या मुलींकडे ..... त्यांच्या धडपडीकडे नुसते पाहावे लागते. हे जग, हे जीवन स्त्री आणि पुरुष दोघांचे आहे. आयुष्याच्या पहिल्या वळणावर भेटणारा पुरुष बापाच्या रूपात असतो. वडील समजदार असतील तर मुलगी शिकू शकते. माझे वडील शिकलेले विचार करणारे आहेत. त्यामुळे मी शिकू शकले. वक्तृत्व स्पर्धेत बक्षिसे मिळवली. त्यांचं प्रोत्साहन मिळालं. पण आज ?
 "मॅडम, माझं बुर्का पहेनणं पाहून माझ्याच कॉलेजातल्या माझ्या जमातीच्या मुलीही आता बुर्का पहेनू लागल्या आहेत. त्यांच्या डोळ्यात माझ्यासाठी प्रश्न उभे आहेत असा भास मला होतो. त्याचंच दुःख मला खूप बोचतं.. खूप बोचतं."
 मोहसिनाच्या आयुष्यात जे प्रश्न उभे राहिले ते अनेक जणींच्या आयुष्यात निर्माण होत नसतील कशावरून? पण हे प्रश्न सोडवायचे तर ते समाजात राहून संवेदनशील व्यक्तींची संख्या अधिकाधिक वाढवूनच सोडवावे लागतील. एकाची वेदनामय संवेदना असहाय हुंदका बनते. तर अनेकांची वेदनामय संवेदना प्रकाशाची वाट शोधते. माझं समजावणं मोहसिनाला आज नाही तरी केव्हा तरी पटेल.



मोहसिनाची सल ॥३७॥