पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मोहसिनाची सल


 दोन-तीन वर्षांपूर्वीची गोष्ट. माझी एक विद्यार्थिनी भेटली. अतिशय अस्वस्थ होती. मन कोमेजून गेलं होतं. पण तिचं दुःख कुणाच्याच लक्षात येत नव्हतं. किंबहुना, इतक्या क्षुल्लक नि साध्या वाबीसाठी मोहसिनानं इतकं हळुवार होण्याची काहीच गरज नाही असंच इतरांचं म्हणणं.
 कोणतं होतं ते क्षुल्लक कारण ?
 मोहसिना एम एस्सी झाली. नंतर बी एड झाली. घरातील वातावरण चांगलं मोकळं सुधारक पद्धतीचं. घरी धार्मिक रीतिरिवाज व्यवस्थित पार पाडले जात. पण मुलींच्या शिक्षणाआड धर्म आला नाही. मोहसिना, तिच्या दोघी वहिणी भरपूर - शिकल्या. हुशारीचं चीज झालं.
 मोहसिना वी एड् झाली. तिचा विवाह झाला.
 तिचा पती रज्जाक, दुबईत इंजिनिअर आहे. तो दोन वर्षे तिकडेच राहणार होता. मोहसिना मात्र इकडे राहणार होती. अर्थात सासरच्या घरी.
 करमत नाही या सबबीखातर मोहसिनाने नोकरी करायचे ठरवले. त्या छोट्याशा गावात लगेच प्राध्यापिकेची नोकरीही मिळाली. सासू-सासऱ्यांनाही कौतुक वाटले. नव्याचे नऊ दिवस छान गेले. मोहसिना इतर प्राध्यापिकांशी छान मिसळून गेली.
 एक दिवस अचानक सायंकाळच्या जेवणाचे वेळी सासरेबुवांनी फर्मान काढले. "बहू कॉलेजमें बुर्का पहनके जाएगी."
 सासूने थोडा विरोध केला . म्हणाली, "इतके दिवस बुर्का घातला नाही. लग्नातही

बहू बेटा जोडीने समारंभात बसली आणि आता कसा बरा दिसेल बुर्का ?"
 पण सासरेबुवांनी निक्षून सांगितले, “आपल्या धर्मात स्त्रियांनी बुर्का घातला पाहिजे हा रिवाज सांगितला आहे. आमच्या घरची बहू रस्त्याने बुर्का न ओढता जाणे म्हणजे घराण्याची बेइज्जत आहे. बहूने नोकरी जरूर करावी. कॉलेजात गेल्यावर शिकवताना बुर्का काढून ठेवला तरी चालेल; पण रस्त्याने घातलाच पाहिजे."
 मोहसिनच्या मनाची तडफड झाली. तिने तिच्या वडिलांना भावुक पत्र लिहिले. त्यांचे उत्तर आले. "तुझं मन मला कळतं. तुझ्या भाभीला मी अशी सक्ती करणार

॥ ३६ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....