पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

शंकरराव अशी आरोळी देत आले ."अरे, काय ही मंडळी ! एसेम धुळ्यात आल्यावर शकुंतलावाई नि शंकररावांच्या घराशिवाय कुठे उतरू शकतो का? हे तर भाऊबंदकीच्या वर झाले. पार्ट्या वेगळ्या झाल्या म्हणून काय माणसं बदलतात?" बोलताना अण्णांनाही मोकळं वाटत होतं आणि आईही अण्णांची आत्मीयता पाहून भरून पावली होती.
 प्रकाश जेमतेम पाचसहा वर्षाचा होता तेव्हाची गोष्ट . त्याच्या पायाला फ्रॅक्चर झाले नि पाय सहा महिने प्लास्टरमध्ये होता. मग तो सतत खिडकीत वसलेला असे. तेव्हा रिक्षा नव्हत्या. घोड्यांचे टांगे असत . आग्रा रोडवर रहदारीपण खूप असे. सततच्या निरीक्षणामुळे आणि मनाच्या एकाग्रतेमुळे तो घोड्यांच्या टापांवरूनं टांग्याचा नंवर अगदी अचूकपणे सांगत असे. कोणी पाहुणे आले की त्याला टांग्याचा नंवर ओळखायला सांगत , तो छंदच जडला होता. त्याच सुमारास नानासाहेब गोऱ्यांचा, साधनेत वहुधा , चुरचुरीत लेख आला होता. 'नाच रे मोरा' या नावाचा त्यात आईवडील आपल्या मुलांच्या साध्या साध्या गुणांचे पाहुण्यासमोर कसे प्रदर्शन करतात यावर शालजोडीतले झपके मारले होते. त्यानंतर केव्हा तरी नानासाहेब घरी आले. आमचे पपा म्हणजे कठीणच . बोलता बोलता हसत आईला म्हणाले, "अग तू कौतुकाने प्रकाशला टांग्याचे नंबर्स ओळखून दाखवायला सांगशील. पण तसं करू नको हं. नाहीतर नानासाहेब दुसरा लेख लिहायचे!"
 "अरे काय हे शंकरराव! एवढी क्रूर चेष्टा नका करू. " नानासाहेबांचे ते "उद्गार अजून आठवतात . वरच्या कापडांचे आकार वेगवेगळे असले तरी या मंडळींचे आंतरिक अस्तर अतिशय निर्मळ आणि तलम होते . त्यांच्या सामाजिक वा राजकीय जीवनात एकांडेपणा नव्हता .
 वसूचा आवाज विलक्षण सुंदर . गोड . तरीही खुल्या आभाळासारखा मोकळा . तिच्यामागे तंबोऱ्यावर वसण्यातही मला सन्मान वाटे. जयप्रकाशजींसमोर वसू गायली होती. डॉक्टरवाईच्या माडीतली ती मैफिल .त्यात वसूने गायलेला मालकंस. कौतुकलेली आई नि वाई. आज वसू नाही. जयप्रकाशजी नाहीत.पण त्या सहवासाचे अमोल क्षण विसरणं अशक्य आहे. आमच्या आयुष्याला केवढी श्रीमंती दिली आईपपांनी !
 मधु लिमये त्या वेळी खूप तरुण होते . लग्न झालेले नसावे . ते धुळ्याला आले होते. मला चॉकलेट नि टॉफी खाताना त्यांची आठवण होते. आरामखुर्चीवर बसून ते सतत वाचीत असत. खूप एकाग्रतेने.
 एकदा साने गुरुजींचे भाषण चौथ्या गल्लीच्या कोपऱ्यांवर होणार होते. भाषणापूर्वी, घरीच हॉलमध्ये गुरुजी विश्रांती घेत होते. शेजारीच प्रकाशचा पाळणा . आत नऊदहा महिन्यांचा प्रकाश . आई भाषणाच्या पूर्वतयारीसाठी गेलेली. घरात दहा वर्षांची



आई : साधीसुधी तरीही असामान्य ॥१०९॥