पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आग्रा रोडवरच्या टकले सरांच्या वाड्यात रहावला आलो आणि तिथे ३६ वर्षे राहिलो. शेजारधर्माचे सर्व आदर्श पाठ या वाड्यात गिरवले जात . आई नि कुसुमताई यांचा मंगळवारचा बाजार, महिन्याचे वाणसामान आणण्याचा वार टरलेला असे . बाजारातली माणसे त्यांना वहिणीच मानत. घरात पाहुणा आला नि पोळ्या कमी असल्या. तर स्वयंपाकघराच्या खिडकीतून पोळीभाजीची देवघेव होई. दोन्ही घरचे पाहुणे उपाशी रहात नसत . टकले बावांचे कुटुंब आपोआप सेवादलाशी जोडले गेले . टकल्यांचे घर परांजप्यांचे घर समजले जाई. मग वाबा गमतीने म्हणत, शंकरराव, तुमचे सर्व सामान एक दिवस तरी रस्त्यावर ठेवायला हवे. त्याशिवाय हे घर तुमचे नाही हे लोकांना कळणार नाही.
 डॉक्टर कमलाबाई अष्टपुत्रे म्हणजे माझी वाई. आईची सख्खी मैत्रीण कम् गुरू वगैरे. आईचे लग्न झाल्याच्या तिसऱ्या दिवशी पपांनी आईला तिच्याकडे नेले होते. तिच्या सहवासामुळे आई राजकारण , समाजकारण यांत ओढली गेली. तरीही या दोन्ही बायका तऱ्हेतऱ्हेचे कपडे मला नि वसूला (डॉ.वसुंधरा भागवत) शिवीत. आई करारी असली तरी स्वप्निलही असावी .
 मी सहा महिन्यांची असेन. १९४१चा सुमार. महात्माजींचे दर्शन घडवण्यासाठी, सहा महिन्यांच्या पिल्लाला तिने भर पहाटे पार्ल्याहून जुहूला नेले होते. माझ्या डोळ्यांनी महात्माजींना प्रत्यक्ष पाहिले आहे याची काल्पनिक अनुभूती आजही माझ्या अंगावर रोमांच फुलवते आणि रस्त्यावरून घाईघाईने जाणारी , नऊवारी लुगड्यातली माझी तरुण नवमाताही माझ्या डोळ्यांसमोर जशीच्या तशी उभी रहाते. चलेजावच्या चळवळीत तिने खादीचे व्रत घेतले. आमच्या घरात वुलेटिन छापले जाई . त्या कामात ती मदत करी आणि माझी चुलत भावंडे भाजीच्या पिशवीतून ते कागद घरोघर वाटीत . अनेक भूमिगत कार्यकर्ते आमच्या घरी येत. अहमदनगरचे हिरवे वकील आमच्या घरी माझे मामा म्हणून राहिले. एस.एम.जोशी मुस्लिम काझीच्या वेषात वावरत . अच्युतराव पटवर्धनांना भेटण्यासाठी पपाही जात. भूमिगत कार्यकत्यांचे निरोप पोचविण्याचे काम आमच्या घरातून चाले.
 आई पपांच्या या अनोख्या संसारातून मला खूप समृद्धी मिळाली . जयप्रकाशजी , राम-मनोहर लोहिया, साने गुरुजी, एस. एम. जोशी नाहीतर नानासाहेब गोरे ही मंडळी आमच्या घरात पाहुणी म्हणून येत नसत तर कुटुंबीय येत असत.
 समाजवादी पक्षाची प्रसोपा आणि संसोपा अशी दोन शकले झाली तेव्हाची गोष्ट. एसेमअण्णा धुळ्याला आले होते. पपा प्रसोपात गेलेले . त्यामुळे संसोपाच्या पुढाऱ्यांनी अण्णांना डाक बंगल्यात उतरवले, अण्णांना तिथे चैन पडेना . ते चक्क उठले नि दुपारी घरी आले . आई गच्चीत तांदूळ निवडत वसलेली होती. अण्णा जिन्यावरूनच

॥१०८॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....