पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/११२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 आई ऑनररी मॅजिस्ट्रेट होती . एकही पैसा खर्च न करता , केव्हाही गेलं तरी काम होणारच याची खात्री असल्याने आईकडे सतत गर्दी असे. इतकी की , इतरांना त्रास होऊ नये म्हणून तिने आपले टेवल खालच्या ओसरीवर मांडले. आजारी वा वृद्ध स्त्रियांचे जवाब नोंदवून घेण्यासाठी वा समक्ष सही घेण्यासाठी ती स्वखर्चानेत्यांच्या घरी जात असे . एक श्रीमंत मुस्लिम दुकानदाराच्या आईची सही घेण्याचा प्रसंग होता. त्यांच्या मोटारीतून त्यांच्या घरी जावं असा आग्रह दुकानदाराने धरला. पण तिने स्पष्टपणे नकार दिला आणि नम्रपणे सांगितले. हे काम माझ्या कर्तव्याचा एक भाग आहे , तुमचे घर अवघ्या दहा मिनिटांच्या अंतरावर आहे. मी चालतच येईन.
 आई नगरपरिषदेत निवडून गेली होती. तिच्या निर्मळ तरीही करारी व्यक्तिमत्त्वाचा दरारा होता. एका निर्व्यसनी , सुशिक्षित आणि ज्याचा भूतकाळ स्वच्छ होता अशा तरुणास नगराध्यक्ष करण्यासाठी तिने इतर स्त्रीसभासदांना पटविले आणि क्याच्या पंचविशीत तो तरुण नगराध्यक्ष झाला. आज महाराष्ट्र सरकारच्या न्यायखात्यात फार मोठे पद तो भूषवित आहे.
 मी वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत एकटी होते. अगदी लाडोवा . अर्थात लाडांनाही कठोर शिस्त होती. ती उपजतंच कलावानं होती. पेटीवर बोटे फिरू लागली की फुलपाखरे नाचत. 'सूरसुखखनि तू विमला' किंवा 'वद जाऊ कुणाला शरण गं' यासारखी नाट्यगीते ती सुरेख वाजवीत असे. तिचे माहेर पार्ल्याच्या गानूंकडचे. सांस्कृतिक समृद्धीचा वारसा तिथूनच तिला मिळाला. पु.ल.देशपांडे पेटीच्या वर्गातले तिचे वर्गवंधू . हा तिचा संदर्भ मला थेट पु.लं.च्या घरात पायरीपाशी नेऊन ठेवीत असे . वालगंधर्व अगदी वयस्कर झाल्यावर त्यांच्या मदतीसाठी पार्ल्याला संगीत रजनी साजरी झाली होती. तिथे पु.ल. आणि सुनीताताई भेटले होते. पार्ल्यात म्हणजे तेव्हाच्या घरगुती पार्ल्यात ती बेबी गानू म्हणून ओळखली जाई . नववी पास झाल्यावर घरगुती कामात तरबेज होण्यासाठी तिचे शिक्षण थांववले गेले पण पेटीचा क्लास चालू राहिला. १९३६ साली वेबी गानूची शकुंतला परांजपे होऊन ती धुळ्याला आली. पपांनी हुंडा घेतला नाही म्हणून त्यांच्या वडिलांची नाराजी होती. सासुरवास करायला सासू नव्हती पण कडक स्वभावाचे सासरे होते. नवरा आधुनिक विचारांचा. प्रत्यक्ष चळवळीतला. वकिलापेक्षा इतर गोष्टीत अधिक रस . पैसा घरात न आणणारा . अशावेळी आईवरच टोमण्यांची खैरात होई . पण ते सारे तिने ताठ राहून नम्रपणे सोसले . पपा नि आईचे सहजीवन जणू दुर्मिळ रसायनच . दोघेही एकमेकांत पूर्णपणे वुडून गेलेले . पपा आईच्या पाठीशी नेहमीच उभे रहात. आपल्या पत्नीला होणारा त्रास ओळखून त्यांनी वेगळे रहाण्याचे ठरवले. मी साडेतीन वर्षांची असताना आम्ही



आई : साधीसुधी तरीही असामान्य ॥१०७॥