पान:वाहत्या वाऱ्यासंगे.pdf/१०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

फुलांनी भरभरून जातो. एरवी सतत सळसळणाऱ्या हिरव्या पानांचे तुरे पार नाहीसे हातात. इथून तिथून हळदकुंकवाचा गच्च सडा . पायतळी आणि फांद्यावरही . ऋतुराज वसंताच्या चाहुलीने गुलमोहर वहरतो तो थेट आषाढमेघांचे पहिले थैव अंगावर उडेपर्यंत ! मदनमंजिरीच्या लत्ताप्रहाराने आणि त्यांच्या मुखातून उधळलेल्या मद्याच्या स्पर्शाने अशोकवृक्ष मोहरतो असे कालिदासादी संस्कृत कवींनी वर्णिले आहे. पण फुलांनी डवरलेला अशोक मी तरी अजून पाहिलेला नाही .
 मात्र ऐन वसंत आणि ग्रीष्मात गुलमोहर वृक्षांवर उधाणलेली लाल नवती वघितली की वाटतं . वसन्तोत्सव साजरा करीत हिंडणाऱ्या अप्सरांच्या ओठांतून उधळणाऱ्या लालबसंती मद्याच्या चुळा या झाडांनी वरच्या वर तर झेलल्या नाहीत ना? नाहीतर असेही असेल. रंगोत्सवातील रंगभऱ्या पिचकाऱ्या चुकवीत धावणाऱ्या परीकन्या फांद्याफांद्यातून लपून तरं वसल्या नसतील ? फांद्याची ओंजळ रंगानं काठोकाट भरून घेताना गंधाचं भान मात्र गुलमोहराला राहिलंच नाही . सपोत निळ्या निळाईवर उठून दिसणारे लालशेंदरी भरगच्च तुरे, डोळाभर पहाताना गंधाची सय येतच नाही . नकळतं , सहजपणे फूल नाकाशी नेले तर काहीसा उग्रट दर्प जाणवतो.
 चैत्रगौरीची आरास मांडताना गुलमोहरच्या डहाळ्या का मांडत नाही कुणी? असा प्रश्न मला नेहमीच पडत असे. त्या फुलांचा चटपटीत रंग मला एवढा आवडे की छोटेपणी मी हट्ट धरून बसायची की याच फुलांचा गजरा करून दे म्हणून ! आईचा डोळा चुकवून गुलमोहराच्या डिक्षा अपऱ्या केसांत खोवून आरशासमोर उभे रहाण्यात मस्त वेळ जाई . शिवाय गुलमोहराच्या फुलांतली पाचवी फिक्कट पाकळी चवीला छान लागायची. किंचित तुरट...आंवट.
 माझी ही गुलमोहरी हौस अचानकपणे तृप्त झाली . उन्हाळ्याचे दिवस . आमची वस पुसदच्या रस्त्याने चाललेली. कलत्या संध्याकाळी कुठल्याशा तांड्यावरच्या वंजारा तरुणींचा घोळका गुलमोहराच्या रंगीत फांद्या नाचवीत , गाणी म्हणत , फेर धरून झुलत होता. होळीचे दिवस होते ते. भवताली लालभडक दिवल्यांचे पेटते झाड असावे तसा गुलमोहर . दरवर्षी वसन्त येतो, आणि मनात बहारून येते ते दीपकळ्यांचे केशरी झाड आणि रंगवाँवरा झुलता थवा. वंजारा तरुणींचा .
 कॉलेजच्या रस्त्यावर दोनही कडांनी निंबोणीची डेरेदार झाडं आहेत . पाडव्याच्या आधीच ही झाडं जोंधळी तंवराच्या नाजूक मंजिऱ्यांनी लखडून जातात . रस्ताभर त्या फुलांचा किंचित कडवट तरीही मधुर गंध सतावीत रहातो. निंबोणीची सावली थंड गारवा देणारी . कोवळ्या अंजिरी पानांच्या कडवट चवीतही आरोग्याचे अमृतघट भरलेले! निंबोणीची कोवळी पानं खाल्ल्याशिवाय पाडवा साजराच होत नाही आपल्याकडे. राजस्थानांत या लिमडीमाचे महत्त्व फार. राजस्थानी रमणींचा लाडका सण बडी तीज . तोही साजरा केला जातो लिमडीच्या पूजेने . घरात पाडव्याचा कितीही

॥ ९८ ॥ वाहत्या वाऱ्यासंगे ....