पान:वामनपंडित १८८४.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९५ ) कविता रचण्यास वरील गुणांची फार आवश्यकता अ सून, ते कारकून या संबंधानें मोरोपंतांत होते असें आ झास वाटतें. दुसरें. - देशभाषेंतील चांगल्या चांगल्या कवींच्या क विता पंतांस वाचावयास सांपडल्या होत्या. तिसरें. - भारत, भागवत, रामायण इत्यादि ग्रंथांवर व स्फुटविषयावरही पंतानें कविता केल्या आहेत. त्यांत इतिहाससंबंधाने अनेक राज्यांच्या विस्तृत कथा आल्या असल्यामुळे, शृंगारादि रसचमत्कृतीस पुष्कळ स्थान मिळाले आहे. चौथें. - ईश्वरगुण वर्णन करण्याचा प्रधानहेतु तर पं-. तांचाही आहे; परंतु इतिहास वर्णावयाचाच नाही असा आग्रह नाहीं. पांचवें. - बहुतकरून सोपें मात्र गणवृत्तच पंतानें घे- तलें आहे. ही सर्व कारणें पंतांची कवित्वशक्ति उत्कर्षानें दाख- विण्यास अनुकूल आहेत. येणेंप्रमाणें उभय कवला कवित्वशक्ति प्रकट कर •ण्यास जी स्वाभाविक अनुकूल प्रतिकूल कारणे दाखविली आहेत; ती ग्रहण करून त्यांच्या कवित्वशक्तीच्या संत्रं- धानें परस्परांची तुलना करून पाहूं. दोन कवींची एकमेकांशी तुलना ल्यास, दोघांनी एकाच कथेवर किंवा करून पहाणें झा- विषयावर जी जी १ वामनपंडित, एकनाथ, मुक्तेश्वर, श्रीधर, अमृतराय, रामदास ज्ञानदेव, मुकुंदराय इत्यादि पंताच्या सन्मणिमालेतील सर्व कवी.