पान:वामनपंडित १८८४.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९६ ) वर्णनें केली असतील, त्यांची परस्परांशी तुलना करून पाहिली पाहिजे. आणि रसपरिपाकादि गुणांत त्या त्या रसविशेषाविषयींची उभयतांचीं वर्णनें एकमेकांशीं ला- वून पाहिली पाहिजेत. सुदामचरित्र हें मोरोपंतानें आणि वामनपंडितानें ही वर्णिलें आहे. तें मोरोपंतानें दोनदा वर्णिलेले पहाण्यांत आलें. त्यांतील कोणत्याही प्रकरणाशीं वामनानें रचिलेलें सुदामचरित्र ताडून पाहिलें तर, मोरोपंताची कवित्वशक्ति वामनापेक्षां फार अधिक होती हैं स्पष्ट दिसून येतें. वामनानें केलेल्या सुदामचरित्राविषयीं त्याच्या का घ्यादि ग्रंथांचे गुणदोष दाखवितांना कांहीं विवेचन केलें आहे. त्यावरून तें चरित्र काव्यदृष्टीनें व ग्रंथदृष्टीनें ही फार दोषयुक्त आहे हे सिद्ध झालेंच आहे. तथापि पं- तांच्या कवितेशी तुलना करण्याकरितां त्यांचे कांहीं वेंचे येथें दाखल करितों. सुदाम्याच्या शरीराचें किती बीभत्स वर्णन केले आहे पहाः - " शिश्री वालतॄणांकुरें पसरिलीं जाती न आच्छादिलीं । " कौपीनांबर छिद्रतोन्मुख सदा निर्लज्ज संपादिलीं ॥ " कांखे पुष्कळ दोंभुजी अणिकही संपूर्ण विस्तारलीं । “नाहीं नापिक नापिका ह्मणुनियां स्वस्वस्थळीं थारलीं ॥ ९॥ “ दाढी-मिशा-बावरभूत ज्याच्या । “ अश्लाध्य तेणें मुखपंक ज्याचा 66 दिसो न येती समजा मनीं रे । “सळे पळे देखुनि कामिनी रे ॥ १० ॥