पान:वामनपंडित १८८४.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९४ ) सहावें. - मासला पहाण्यासारखी मराठी कवींची क विता वामनास पहावयास मिळाली नव्हती. सातवें. - रचना करावयास फार कठिण; अशीं अक्षर- गणांची वृत्तेच वामनाने घेतली आहेत. हीं व आणखी कांहीं कारणें वामनाची कवित्वशक्ति प्रकट होण्यास प्रतिकूल होतीं असें वाटतें. आतां मनाची अप्रतिहत गति चालवून पाहिजे त्या रीतीनें उड्डाण करण्याजोगें, व नानाविध अलंकारपूरित वर्णन केले तरी शोभण्याजोगें, ज्याचें महत्त्व आणि रूप आहे; अशा परमेश्वराच्या वर्णनाकडे मात्र वाम- नानें आपली वाणी बहुधा लाविली आहे. तेव्हां त्या वर्णनांत पाहिजे तो रस आणि पाहिजे तशी प्रौढी आण- ण्यास त्याला पुष्कळच सवड मिळाली. कवीला कल्पना करण्याची जी शक्ति आहे तीपेक्षांही या विषयाचा विस्तार किती मोठा व गहन आहे हे सांगावयासच नको. ह्मणून अशा प्रगल्भ, रम्य आणि उदात्त विषयाची जी वामनानें निवड करून घेतली ही त्याच्या कवितेस अ- त्यंत अनुकूल गोष्ट आहे. ही वामनपंडिताच्या संबंधानें गोष्ट झाली. आतां मोरोपंताकडे पहा. तो कारकून होता यामुळे त्यास लाखों रुपयांच्या हिशेबांत आणापैची सुद्धां चूक राहूं देणें स्वभावतःच आवडत नव्हते. त्या मानानें त्यानें आपलीं पधें ही तशींच तपासिली आहेत असे दिसतें. कारकून हिशेबी कामांत जसा, तसाच व्यवहारांतही दक्ष असतो. जनमनोरंजन आणि मानसरहस्य जाणणे ह्या गुणांचा त्यास साहजिक व्यासंग होतो. मनोरंजक आणि निर्दोष