पान:वामनपंडित १८८४.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

W त्या- कारणामुळे लोकांच्या मनास चमत्कृति वाटण्याजोग्या कल्पना त्यांजकडून तितक्या चांगल्या होत नाहीत. पं डितपणा ह्याच गुणामुळें वामनपंडिताविषयी आह्मी व रील कल्पना केल्या आहेत असे नाही, तर याबद्दल त्याच्या ग्रंथांतही कांहीं मासले दृष्टीस पडतात. पैकी सुदामचरित्राचा मासला पुढे दाखविला आहे. त्या वरून जगापुढे आणावयाच्या साधुचरितांत अमंगल व . बीभत्स कसें लिहावें, ह्याचा विचार व्यवहारज्ञानाच्या अभावामुळेंच वामनपंडितास झाला नाहीं हें उघड आहे. दुसरें. - वामनानें आपलें सर्व आयुष्य संस्कृतांतील शास्त्राभ्यासांत घालविलें आणि शेवटी विरक्तपथ स्वीका रिला. यामुळे काव्य चमत्कृति रसांचें आस्वादन कर ण्यास त्याजला संधीच मिळाली नसावी. असें वाटतें. ल तिसरें. -पंडितास उपरति झाल्यानंतर त्यांनी मराठी भाषेंत कविता करावयास आरंभ केला. तेव्हां त्यांची ब- हुतेक सर्व कविता ईश्वरगुणवर्णन आणि अध्यात्मविद्या यांखेरीज दुसऱ्या विषयावर नाहींच. अर्थात् भक्ति आणि शांत या रसांनी मात्र त्याचा मनःसमुद्र भरला होता असे दिसतें. .. चवथें.-मनुष्यगुण किंवा इतिहास वर्णन करण्याचा वामनाचा हेतु मुळींच नव्हता. उलटें असें वर्णन करण्यांत वाणीचा खर्च करणें निष्फल होय असा ज्याचा होता. हे त्याच्या चरित्रांत आह्मी व्यक्त केलेच आहे. पांचवें. - शृंगारविरादि रसाचा विषय हाच कवितेची खरा विषय आहे; परंतु वामनाने अशा विषयास तुच्छ मानिले होते. CS भो