पान:वामनपंडित १८८४.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

जपून रा जेव्हां एकाद्या ग्रंथांत गोंविली जातात तेव्हां त्यांचा वि चार भोजनपात्रांतील पदार्थसमुदायाच्या उपमेनें केला पाहिजे. लोकांस रुचणारे व लोकांपुढे मांडण्यास योग्य अ शाच रसांचीं फलें भोजनपात्रांत मांडिली जातात. त्या- प्रमाणें ग्रंथांतही लोकमान्य रसांचीं पद्येच घातलीं पाहिजेत. • फळास किंवा हरएक रसाळ पदार्थास कुजकेपणा, कीड, अपरिपक्वता इत्यादि वैगुण्ये असली तर, मेजवा - नीच्या भोजनांत ती जशी स्वभावतः दूषित व उपहासार्ह होतात; त्याप्रमाणेच ग्रंथांतील वाक्यें किंवा पधें, श- उददोष, अर्थदोष, अलंकारदोष, व्याकरणदोष इत्यादि कारणांनी दूषित व उपहासास पात्र होऊन, त्या योगानें सर्व ग्रंथच दूषित होऊन जातो. याप्रमाणें कवितेचें रूप व तत्त्व आहे, तेव्हां कवित्व- शक्तीच्या संबंधानें पंतांची आणि पंडितांची तुलना करि- तांना हें कवितेचें रूप आणि तत्त्व मनांत ठेविलें पाहिजे.

आतां ही तुलना करण्यापूर्वी पंडित आणि पंत ह्यांची स्थिति, कवित्वशक्तिप्रदर्शनार्थ त्यांस कसकसी अनुकूळ अथवा प्रतिकूळ होती तें पाहूं. वामनपंडित हे खरोखरच महान् पंडित होते. त्यां जला संस्कृतविद्याध्ययनाखेरीज बाकी सर्व व्यवहार साधारणच माहित असतील. ही गोष्ट शुद्ध शास्त्री, पंडित ह्यांच्या व्यवहारज्ञानावरून आपणास खचित मानितां येईल. व्यवहार ज्यास चांगला समजत नाहीं, | त्यास मानसशास्त्राची मर्फे समजत नाहींत. आणि याच