पान:वामनपंडित १८८४.pdf/९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ९१ ) 15 MAY 2007 चार केला तर, प्रसादादि गुण, उपमा, स्वभावोक्ति, यम- कानुप्रासादि अलंकार यांच्या योगानें रसांची पुष्टि होते. तथापि काव्यत्वास चमत्कृतिजनक कल्पनांचीच आव श्यकता आहे. यास्तव ज्याच्या ग्रंथांत मनास चमत्कृति | देणाऱ्या कल्पना व गुणालंकार चांगले व पुष्कळ अस तात तो उत्तम कवि होय. काव्याचा आत्मरस असून, इष्टार्थ दाखविणारी जी पदरचना ते काव्याचें शरीर आहे असे मानितात. या स्तव ज्यांत इष्टरस भरला आहे अशी जी पदावलि तेंच काव्य. प्रकृत पंतपंडित ह्यांच्या ग्रंथांची काव्यसंबंधानें तुलना करितांना काव्यत्वाकडे विशेष सूक्ष्म दृष्टीने पा हिले पाहिजे. काव्याच्या उपमेस आपण फल घेऊन पाहूं. फलाचें शरीर आणि त्यांतील रस यांत स्वभावतः पृथकूपणा नसून पृथक्शाव ज्याप्रमाणेच प्रतीतीस मात्र येतो; त्याप्रमाणेंच काव्याचें शरीर आणि त्याचा आत्मा ( रस ) ह्यांचा एकमेकांशी संबंध आहे. बीजाप्रमाणें वृक्ष तयार होऊन त्यास त्या जातीचें फल ह्मणून येतेंच. व कोणत्याहि फळाला कांहीं तरी एका प्रकारचा रस असतोच. तेव्हां कोणत्याही रसाचें जर्से फल तसे कोणत्याही रसाचा वाक्यसमुदाय काव्य होय, असें ह्मणावयास कांही हरकत नाहीं. ही गोष्ट ष्टथक् पृथक् वाक्यास किंवा पद्यास ती नि. रनिराळी पाहिली असतां मात्र लावितां येईल. जसें ए- कांदें फल सहज रीतीनें पहाण्यांत आले असतां त्याची फलत्वसंवधानें गणना करितां येते. तसें सामान्यत्वेंक- रून स्फुटपद्यही कवितेत गणितां येईल. परंतु ती पद्ये KASHINATH G. MARATE. BHOR