पान:वामनपंडित १८८४.pdf/९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

66 66 निर्दोषा लक्षणवती सरीतिगुणभूषणा 'सालंकाररसानेकवृत्तिर्वाकाव्यनामभाक् " " ( ९० ) रसप्रधानाः शब्दार्था गुणालंकारवृत्तयः रीतयश्चेयती शास्त्रप्रमेयं काव्यपद्धतिः " 66 प्रतापरुद्र. बृहत्चंद्रालोक. याप्रमाणे साहित्यशास्त्रांत वेगवेगळ्या ग्रंथकारांनीं थोडाबहुत फरक करून काव्याचें एकसारखेच ल- क्षण केलें आहे. त्या सर्वांचा सारांश काढून व्यापकप- णानें काव्याचें सर्व साधारण लक्षण असे करितां येतें की, " इष्टरसांची पुष्टि करणाऱ्या निर्दोष शब्दार्थांची व चमत्कारिक कल्पनांची वाक्यपंक्ति " ती कविता हो- य. मग ती गद्यांत असो किंवा पद्यांत असो, त्यामुळे काव्यत्वांत कांहीं फरक होत नाहीं. आतां काव्यप्रकाशादि ग्रंथांत गुणालंकारादिकांनीं युक्त असलेली वाणी कविता ह्मणून व्याख्या वाढविली आहे; परंतु इष्टरसाच्या पुष्टीला जें साहित्य लागावयाचें त्यांत गुणालंकारादिकांचा अंतर्भाव होतो, यामुळे ते ल- क्षणांत टथकूपर्णे दाखवून व्याख्या वाढविण्याचें कांहीं कारण दिसत नाहीं. यास्तव आह्मी वर केलेल्या व्या- ख्येप्रमाणे काव्य रचण्याची जी बुद्धिशक्ति, तिला क- वित्वशक्ति असें ह्मटलें पाहिजे. आतां इष्टरसांची पुष्टि कशानें होते ह्याचा सूक्ष्म वि. १ पक होतें. 66 'इष्ट रसात्मक वाक्यपंक्ति, " इतकेंच कवितेनें लक्षण व्या-