पान:वामनपंडित १८८४.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८९ ) तेव्हां त्यांची एकमेकांशी तुलना करणें हें मोठ्या महत्वा- चें व अभिनंदनाचें कार्य आहे, असें कोण ह्मणणार नाहीं ? कवित्वशक्ति ह्मणजे पद्यांत ग्रंथ लिहिण्याची शक्ति, अशी लोकांची साधारण समजूत पुष्कळ दिवसांपासून होती, व ती वामनपंडिताच्या आणि मोरोपंताच्या वेळीं ही चांगल्या रीतीनें प्रघातांत होती असे वाटतें. का- रण, त्या वेळीं गद्यांत ग्रंथ लिहिण्याचा कोणत्याही विद्वानानें यत्न केलेला आढळत नाहीं, आपण कवि हो- ऊन बुद्धीचा व भाषेचा जो अति उत्कृष्ट परिणाम त्या- स पात्र व्हावें, अशी प्रत्येकास इच्छा असते. तिच्या तृत्त्यर्थ त्या काळी सर्वत्र पद्यांत लिहिलेले ग्रंथ मात्र आढ- ळतात. ज्यांत कांहीं अर्थ नाहीं, रस नाहीं, आनंदजनक- ता नाहीं, अशा गोष्टींनीं भरलेलीं हजारों पद्ये दृष्टीस पडतात; परंतु त्या सर्वांस सरसकट कविता असें नांव दिलेले आढळतें. आलिकडे ह्या तत्त्वावर पुष्कळ ठिका- णीं पुष्कळ विद्वान् लोकांनी वाटाघाट केल्यावरून, व- रील संशय बहुतकरून सर्वत्र दूर झाला आहे असें वा- टते. तथापि कवित्वशक्ति ह्मणजे काय ह्याची व्याख्या एथें प्रदर्शित करणें अवश्य आहे. कारण, कोणत्या त- त्वावर वरील पंतपंडित यांची आह्मी तुलना करितों हैं त्यावरून चांगलें लक्ष्यांत येईल. आतां प्रथम कविता कशास ह्मणतात ते पाहूं.- तददोषौ शब्दार्थौ सगुणावनलंकृती पुनः क्वापि. " “ क्वापीत्यनेनैतदाह यत् सर्वत्रसालंकारौ क्वचित्तु स्फु- 'टालंकारविरहेपि न काव्यत्वहानि: " 66 काव्यप्रकाश.