पान:वामनपंडित १८८४.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्रीलं. याचनालय, भो संस्कृत आणि प्राकृत शब्दांचा समास करणें, सं- स्कृत शब्दांचीं रूपें बदलणें इत्यादि अनेक प्रकारचे दोष वामनाच्या ग्रंथांत सांपडतात. ते विस्तारभयास्तव एथें देत नाहीं. वामनपंडिताच्या ग्रंथांतील व काव्यांतील गुणदो-1. पांचा विचार केला तर, पूर्णिमेच्या शरच्चंद्रांतील कलंका- प्रमाणे त्याचे दोष, गुणप्रकाशकिरणांनी झांकून जाता- त; इतकेंच नाहीं तर ते त्याच्या ग्रंथास कोठें कोठें उ- लटे शोभा देणारेही होतात. बुद्धिपूर्वक ठाकठिकीनें रचना केली असतां ती दोषरहित होते खरी; परंतु व र्णनीय विषयांत निमग्न व तल्लीन होऊन उद्गाराबरोबर जे शब्द बाहेर पडतात त्यांच्या योगानें झालेल्या रचने- सारखी ती रसाळ होत नाहीं. वामनानें केलेली वर्णनें सर्व तन्मय होऊन केली आहेत; यामुळे ती फार रस- • भरित झालीं व दोषांनी त्यांस कोणत्याही प्रकारें न्यू- नत्व आलें नाहीं अर्से मानण्यास हरकत नाहीं. व कवित्वशक्ति आणि ग्रंथरचना ह्यांच्या संबंधानें वा- मनपंडित आणि मोरोपंत ह्यांची तुलना करणें हें अपूर्व व अभिनंदनीय काम आहे. कुशाग्रबुद्धीच्या वर्गापैकी ब्राह्मणजातीच्या लोकांतलेच दोघेही असून, दोघेही पहिल्या प्रतीचे संस्कृतज्ञ, एक महापंडित, व दुसरे बा णेदार कारकून; दोघेही महाराष्ट्रभूमीचे पुत्र असून, ' १ संन्याशाचें सोंग संपादिलें सांग || वैराग्याचें आंग आणितां नये ॥ १ ॥ चातुर्याचे योगें कवित्व करिती सांग || प्रसादिक रंग आणि- तां नये ॥ ३ ॥ ज्ञानदेवकृत अभंग.