पान:वामनपंडित १८८४.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८५ ) दर पद्यांत कोठेंही न आल्यामुळे अर्थसंदर्भात व्या- मोह होतो. व न्यूनपदत्वादि दोष होतात. या ठिकाणीं:- 66 स्वयें ईश सर्वज्ञ जो उद्धवातें । 66 99 ' पुसे नीति वंदूं तया माधवातें ॥ अशी दुरुस्ती केली तर कांहीं बरें होईल. घे ज्या गृहींच उचलूनि अधोक्षजाला । बेडी निघोनि अति सत्वर मोक्ष झाला || माया तयाच सदनीं भरि शृंखळाला | जागे करी स्वरुदितेंचि तया खळाला ॥ २४ ॥ कृष्णजन्म. 66 66 यांत पहिल्या व शेवटल्या चरणांतील चकार निर- र्थक अधिक आहेत. पहिल्या चरणांत "गृहींच " या ठिकाणी "गृहांत " असा शब्द आणि चौथ्या चरणां- तील " चितया " एथें " सकळा " असा शब्द घातला असतां वरील पद्याची बरीच शुद्धि होईल. अप्रयोजकत्व, अश्लीलत्व, ग्राम्यत्व हे दोष वामना- च्या सुदामचरित्रांत बरेच सांपडतात. ते एथें आणखी विस्तारभयास्तव देत नाहीं. वर दाखविलेच आहेत. छंदोमंगही अनेक स्थळीं आढळतो. विराटपर्व अध्याय १ 66 " 'प्रमाण संवत्सरे द्वादशाचें ” १० 66 आह्मा निमित्त श्रम होति समग्र ज्या " १९ संगीत नृत्य शिकवी निजक्षि प्रसंगी " 66 २२ ८