पान:वामनपंडित १८८४.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८३ ) ल ग्रंथ वाचल्याने चांगले लक्षांत येईल. उदाहरणें दा- खविण्यास येथें स्थलावकाश नाहीं. च्युतसंस्कृति अथवा संस्कारहीनत्वादि दोषः- श्रवण कीर्तन माधववंदनें । जळति पूर्विल पापहि काननें ॥ विधिकरांप्रति यास्तव ये रिती । वदतसे यम संयमनीपती ॥ ४ ॥ नामसुधा. यांत "पापकाननें " असा समास इष्ट असून त्यां- तील पाप आणि काननें या दोन पदांमध्यें "हि" हें निरर्थक अक्षर घुसडून दिलें. या योगानें केवळ संस्का- रहीनत्वाचाच दोष झाला इतकेंच नाहीं, तर संस्कार- हीन अशा महाराष्ट्रभाषेंत जो शब्द वापरण्याची रीति नाहीं तशा शब्दाची कवितेंत योजना केली !! " “पापहिकाननें " या ठिकाणी "पातककाननें" असा शब्द घातला असता तर च्युतसंस्कृतीचा दोष झाला न सता अथवा " पातककाननें" असाच मुळचा पाठ अ- सून लेखकप्रमादानें त्या ठिकाणी " 'पापहिकाननें " झाले असेल असेंही संभवतें. दुसरें, श्रवण, कीर्तन, माधव-वंदन याकारणानें पा- तककाननें जळतात असे कार्य वर्णिलें आहे; कारणांत दाहक शक्तिप्रदर्शक पद मुळींच नाहीं, यामुळे न्यून- पदत्वादि दोष होतात. ऐसें असोनिहि मुखीं हरिनाम आलें । नेणों महासुकृत कोठुनि हें उदेलें ॥