पान:वामनपंडित १८८४.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

{ ८२ ) नाहीं. वारा इकडून तिकडे वाहणें व अर्थ नसणे ह्या गोष्टींचेंच गंधर्वनगराशीं सादृश्य केलें असल्यास, का व्याच्या रीतीप्रमाणें या साम्यांत यत्किंचितही चम त्कार नाहीं. हें सहज समजण्यासारखे आहे. वरील पद्यांत व्याकरणसंबंधी व कवितालक्षणसं- बंधी आणखी दोष आहेत. " सदनि" "नाम" ही स-2 समीची रूपें दीर्घ इकारांत पाहिजे होतीं तीं हस्व केल्या- मुळे अशुद्ध झालें. “कीं" हें निरर्थक जास्ती. “जणों” आणि " जैसे " हे दोन्ही शब्द अनुक्रमें उत्प्रेक्षा आणि उपमा दाखविणारे आहेत. तेव्हां उत्प्रेक्षा करणे झाल्यास "जैसें " हा शब्द जास्ती आहे, व उपमा क रणे झाल्यास " जणों " हा शब्द जास्ती आहे. "न- भि जैसे" हे शब्द काढून " अवकाशीं " असा शब्द घातला तर बराच दोष कमी होईल असे वाटतें. " द्वारकाविजय सर्ग दुसरा यांत भगवान् श्रीकृष्ण ह्याच्या भुवनाचें वर्णन ३३ साव्या श्लोकापर्यंत उत्तम रीतीनें करून ३४ | ३५ | ३६ या श्लोकांत, ईश्वरगुण वर्णन करण्यास उत्तेजन दिले आहे. येथपर्यंत वर्णनी- यरसास कांहीं विपर्यास आला असे वाटत नाहीं. परंतु ३७ | ३८ या श्लोकांस आरंभ झाला ह्मणजे लागलाच रसविपर्यास होतो. विश्वभूषण अशा श्रीकृष्ण भुवनाचें अत्यानंददायक वर्णन अवलोकन करून, त्या आनंद- भरांत निमग्र असतां ३७ । ३८ श्लोकांतील काकतीर्था- ची व्याख्या पाहिल्याबरोबर, आनंद जाऊन किळस येऊं लागते; हा या ठिकाणी मोठा दोष आहे. हे वरी-