पान:वामनपंडित १८८४.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

' अप्रयोजकत्व, ग्राम्यत्व इत्यादि दोष बरेच आहेत, ह्म- णून आह्मी वर दर्शविलें आहे. त्या दोषांच्या संबंधाने त्याच्या कवितेचीं कांहीं उदाहरणें येथें देऊन स्पष्टता करितों. ही उपमा किती विसंगत आहे पहा:- सुदाम्याच्या धार्मी किमपिहि नसे अर्थ भलता | पहातां वायूची सदनिं दिसते की प्रबलता || तृणें पर्णे जीर्णे करुनि शतछिद्रे मिरवलें । जणों गंधर्वाचें नगर नभि जैसें उगवलें ॥ सुदामचरित्र. संध्यासमयीं सूर्यरश्मीच्या योगानें चित्रविचित्र रं- गांचे मोठमोठाले भव्य व सुशोभित मेघसमुदाय आका- शांत दिसतात त्यांस गंधर्वनगर असें ह्मणतात. वरील पद्यांत सुदाम्याच्या तुटक्या झोंपडीस गंधर्वनगराची उप- मा दिली आहे. परंतु कोणत्याही प्रकारें झोंपड्याशी त्या नगराचें सादृश्य होत नाहीं. पहा, गंधर्वनगर क्ष- णभंगुर, भव्य, विस्तृत, शोभायमान, तेजस्वी असे प्रसि द्ध आहे. यांतून झोंपड्यांत एक तरी गुण आहे काय ! क्षणभंगुरत्व मानिलें तर अनेक वेळां मोडत असलेलें झों- पडें पुनः पुनः बांधण्याचा खर्च करण्यास सुदाम्यास सा- मर्थ्य होतें, असें होऊन त्याचे दारिद्र्यातिशयास वैय्य- र्थ्य येऊं पहातें. यास्तव असें मानणें बरोबर होणार नाहीं. भव्य, विस्तृत, शोभायमान, तेजस्वी असें झोंपडें होतें ह्मणून मानल्यानें वर्णनीय हेतूस उघड विरोध दि सतो. मग ही उपमा पंडितानें कां घेतली हे कळत KASHINATH G. MARATHE.