पान:वामनपंडित १८८४.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ८० ) अहो भाग्य यांचें अहो भाग्य यांचें । सखे सोयरे ब्रह्म कृष्णाख्य ज्यांचें ॥ ६७ ॥ ब्रह्मस्तुति. ॥ वेणुध्वनी तो सुरगायकांनीं । त्यांच्या विमानांतचि बायकांनीं ॥ आश्चर्य कानीं पडतांचि केले । न तृप्त ज्यांचें मन हें भुकेलें ॥ १ ॥ मोहती व्रज-पशू-मृग- गाई । आमुचे नवल काय अगाई स्तब्ध होति लिखितें जशिं चित्रे | वेणुच्या ध्वनिरसेंचि विचित्रें ॥ २ ॥ वेणुसुधा. हा प्रास यमकांचा मासला पहा:- गजगती जगतीप्रति दाविते । वसुमती सुमती सुख भाविते ॥ स्वतनुजा तनु जाणतसे धरा । नवरि ते वरिते मणिकंधरा ।। ५८ ।। नवसुधा वसुधा-तनया स्मरा | जनमनीं नमनीं वश जे स्मरा ॥ स्वपति तो पतितोद्धर तो खरा । नवरि ते वरिते रघुशेखरा ॥ ५९ ॥ सीतास्वयंवर. | वामनपंडिताच्या कवितेंत च्युतसंस्कृति, विसंगति,