पान:वामनपंडित १८८४.pdf/८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७९ ) द्विज गुरु सहनेत्रा उत्पलीं सोम वाटे ॥ नटति युवति गाती कीर्ति बंदी विमानीं । • प्रियतम जन आत्मा आपुला जेविं मानी ॥२१॥ त्रेतायुग कृतयुगापरि काळ जाला । देखूनि राज्य करितां रघुवंशजाला || धर्मज्ञराम सुख दे सकळां प्रजांला । प्रेमें प्रजा भजति त्या भरताग्रजाला ॥ २८ ॥ पदयुग मृदु जें कां पलवा-तुल्य वाटे । तदपि तुडवि कांटे दंडकारण्यवाटे || स्मरत चरित त्याला ठेवुनी तोचि ठेवा | गमन करि मनीं ते लोकहो पाय ठेवा ॥ १९ ॥ भागवतरामायण. गभीत अर्भक जरी जननीस लाता । हाणी तयास हरि काय करील माता ॥ हें विश्व आणि कमळासन अंडकोटी | यांतील काय मज सांग तुझ्या न पोटीं ॥ ४० ॥ धन्या अहो व्रजवधू ब्रजलोक गायी । ज्यांच्या स्तनें करुनि तृप्त सुधाब्धिशायी || • प्यालासि वत्स सुत होउनियां जयांचीं ।- दुग्धं न वर्णवति धन्यपणे तयांचीं ॥ ६३ ॥ अहो धन्य गौळी अहो धन्य नंद । ब्रज सर्वही धन्य हो प्राणि-वृंद ||