पान:वामनपंडित १८८४.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७८ ) कोणी श्रांत कुचावरी करतल श्रीमूर्तिचें ठेविलें । कोणी ओष्ठहि नाचतां मुख मुखीं घालूनि आस्वादिले ॥ गांठी कंचुकिच्या जगद्गुरुकरें गोपींचिया सूटल्या । ग्रंथी चिज्जड त्या अनादि रचिल्या त्याही अहो तूटल्या॥ कृष्णाच्या अधरामृतें अमरता तात्काळ त्या पावल्या । नीवीमोक्ष मुकुंदहस्तकमळें तो मोक्ष त्या लाधल्या ॥ १५ ॥ नेले राजस राग ते अधरिंचे श्रीवल्लभें चुंबनें । दृष्टीतील निरंजनें हरपलीं जीं तामसें अंजनें ॥ जें कां चंदनसत्वही हरि हरी त्यांचें निजालिंगनें । केल्या निर्गुण त्या रतांतसमयीं गोपी जगज्जीवनें ॥ १६॥ रासक्रीडा. अयोध्यानगरीचें भागवतरामायणांतील रामचंद्राच्या वर्णन, द्वारकाविजयांतील श्रीकृष्णाच्या भुवनाचें व बाग- बगीच्याचे वर्णन, वेणुसुर्धेतील वेणुरवाच्या माधुर्यातिश- याचें वर्णन, विश्वासबंधांतील अद्वैतबोध, भीष्मयुद्धांतील रौद्र, वीर, वात्सल्य, सीतास्वयंवरांतील शृंगार, वामन - चरित्रांतील अद्भुत, ब्रह्मस्तुतींतील भक्ति, इत्यादि अनेक स्थळीं वामनानें काव्यरीतीने फार चांगली वर्णनें केलीं आहेत. त्यांचा उतारा ऐथें देण्यास स्थलावकाश नाहीं. यास्तव मासला पहावयाची ज्यांची इच्छा असेल त्यांनीं वर लिहिलेले ग्रंथ अवलोकन करावे ह्मणजे त्यांस आह्मी ह्मणतों याप्रमाणे प्रतीति येईल. हीं माधुर्य व प्रसाद यांची उदाहरणें पहा:- रघुपति अति शोभे पुष्पकी व्योमवाटे ।