पान:वामनपंडित १८८४.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ७७ ) श्रीकृष्ण याविषयीं जी त्याची निःसीम व पवित्र प्रीति तिच्या पुण्याचा त्यास घमघमाट सुटला आहे. ग्रंथाचे गुणदोष दाखवितांना शृंगाराचीं कांही उदा- हरणें देण्यांत आली आहेत; तथापि ज्यांत शृंगार उ त्कर्षानें वर्तत आहे अशा रासक्रीडेंतील मासला अवश्य पाहिला पाहिजे. यास्तव त्यांतील थोडे वेंचे घेतों. कालिंदी-तट-वाळुवंट गगनीं संपूर्ण तारापती । कल्हारी कुमुदोत्पलीं अलि शरत्कालीं जलीं गुंजती ॥ वारा मंद सुगंध शीतल फुलें नानातरू शोभती । ऐशा यामिनि गोपिका हरिसवें रासोत्सवीं क्रीडती ॥२॥ रूपें तीं स्मर कल्पवृक्षहरिचीं गोपांगना त्या लता । कीं ते मेघसमूह त्या चमकती त्यांमाजि विद्युल्लता ॥ की तारायुवती अनंत गगनीं मूर्तीमधें नीलता । जेव्हां एकचि तेधवां उडुगणीं भू चंद्रमा खालता ॥७॥ गो-या गौळिणि सांवळ्या हरितनू रासोत्सवीं नाचती । श्रीगंगे यमुनेमधें तरल ते कल्लोल आंदोलती । गोपीलोचन मीन लोलमकर श्रीकुंडलें डोलती ॥ गोपस्त्री कुचकुंभतारक करी पोंहे रतीचा पती ॥ ८ ॥ कोणी लाविति नाचतां मुखमुखा तांबूल त्यांचे मुखीं । कोणी मानवला हरी मजवरी ऐशाच भावें सुखी ॥ त्यांच्या देखुनियां कळा स्तुति करी त्या त्या गुणासारखी। जे ते आवडती ह्मणे मज अशी नाहीं दुजी आणखी १० कोणी श्रीभुजदंड हुंगिति गळां जे आपुल्या घातले । जे स्वाभाविकही सुगंध अगरु श्रीचंदनें चर्चिले ॥