पान:वामनपंडित १८८४.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तके जपून वापरा T त्याही प्रकरणांत शोधल्यास आढळणार नाहीं. यथार्थ- दीपिकेंत मुळ कवितात्मक भाग फारच थोडा आहे, यामुळे वामनाची कविता तुकारामाच्या कवितेच्या वर्गा- त फार थोडी जाईल. व बाकी राहिलेल्या दोन वर्गांत तिचा मोठा भाग समाविष्ट होतो, तथापि वामनाचीं जीं पद्ये कवितेत मोडली जातात त्यांत मध्यम प्रतीच्या क वितेचा भाग अधिक निघेल असे वाटत नाहीं; उत्तम क वितेचीच संख्या अधिक होईल असा अजमास आहे. संस्कृत साहित्यांत उत्तम, मध्यम, कनिष्ठ असे काव्याचे तीन विभाग करून, व्यंग्यार्थ प्रधानकाव्यास उत्तम मानितात. वामनाच्या ग्रंथांत व्यंग्यार्थ प्रधान क विता क्वचित् निघाली तर निघेल. वस्तुतः तसें काव्य कर ण्याच्या हेतूनें वामनानेंच काय परंतु महाराष्ट्रभाषेंतील एकंदर कवींतून कोणीच कविता केलेली आढळत नाहीं. तथापि मराठीत शब्दवैचित्र्य, अर्थवैचित्र्य, आणि उभय- वैचित्र्य अशाच कवितेचा मासला सर्वत्र असल्यामुळे, त्या मानानें वामनाच्या कवितेविषयीं निर्णय करितांना तीस आह्मी उत्तमादि विशेषणें दिली आहेत. ध्वनिकाव्य उत्तम किंवा तदितर उत्तम ह्या गोष्टीचा विचार करण्याचें प्र स्तुत कारण नाहीं. यास्तव तो विचार तसाच ठेवितों. ~ वामनानें वर्णिलेला शृंगार फार साधा आणि भक्ति- मिश्रित आहे. तो बहुधा भगवान् श्रीकृष्ण ह्याच्या 1 लीलावर्णन प्रसंगींच त्यानें भक्तिपुरःसर वर्णिला आहे. यामुळे सहजच तो पवित्र, सुनिर्मल, प्रेमनिर्झरांनी भर- लेलें पुण्यसरोवरच बनला आहे. वामनाच्या शृंगारास ( पापवासनेचा वास नाहीं इतकेंच नाहीं तर, विश्वात्मा